महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

रिमिक्स गाण्यामुळे दिग्गज गीतकार, संगीतकार अस्वस्थ, मिळून जाणार न्यायालयात

अलिकडे बॉलिवूडमध्ये रिमिक्स गाण्यांचा सुळसुळाट झालेला आहे. यामुळे गीतकार खूप नाराज झाले आहेत. सर्वांनी मिळून कोर्टात जाण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये ए.आर. रहमान, प्रसून जोशी, समीर अंजान आणि जावेद अख्तर यांचा समावेश आहे.

Javed Akhatar and Rehaman
जावेद अख्तर, रहमान

By

Published : Apr 13, 2020, 5:04 PM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये रिमिक्स गाण्यांचा ट्रेंड सुरू झाला आहे. जुन्या गाण्यांचे एका पाठोपाठ एक रिमिक्स होत आहेत. यामुळे गाण्याचे मुळ गीतकार आणि संगीतकार नाराज झाले आहेत. याबाबत ए. आर. रहमान आणि प्रसून जोशी यांची सर्वात पहिल्यांदा प्रतिक्रिया आली होती. आता यात आणखी एक मोठे नाव सामील झाले आहे. कुछ-कुछ होता है, राजा हिंदुस्तानी, आणि कभी खुशी कभी गम यासारख्या चित्रपटांचे गीतकार अंजान यांनीही रिमिक्सला विरोध केला आहे.

गीतकार अंजान यांनी म्हटलंय की, रिमिक्स गाण्यामध्ये मुळ गीतकार आणि संगीतकारांना श्रेयही दिले जात नाही. यामुळे न्यायालयात जाऊनच यावर उपाय शोधता येईल. याबाबतीत त्यांनी गीतकार जावेद अख्तर यांच्याशीही बातचीत केली आहे.

जावेद इंडियन अख्तर हे परफॉर्मिंग राइट सोसाइटी (IPRS) चे चेअरमन आहेत. एका आघाडीच्या पोर्टलशी बोलताना समीर यांनी सांगितले, ''जे होत आहे ते बिल्कुल योग्य नाही. आम्ही याच्या विरोधात असून कोर्टात जायची तयारी करीत आहोत. कारण आम्ही गाण्यांचा अधिकार त्या विशिष्ठ चित्रपटासाठी दिलेला असतो. गाण्याचा उपयोग दुसऱ्या प्रोजेक्टसाठी किंवा सिनेमासाठी केला जाऊ शकत नाही. मी जावेद अख्तर यांच्याशी बोललो. आम्ही सर्वजण मिळून कोर्टात जायाचे ठरवले आहे. ''

अलिकेड अनेक रिमिक्सचे वाद पुढे आले आहेत. रॅपर बादशाहने बंगाली लोकगीत 'लाल गेंदा फुल' गाण्याचे रिमिक्स केले होते. त्यानंतर मुळ गीतकार रतन कहार पुढे आले होते. त्यानंतर तनिष्क बागची ने 'दिल्ली ६' मधील 'मसाकली' गाण्याचे रिमिक्स केले होते. यांनतर मुळ संगीतकारांनी यावर आक्षेप घेतला होता. गायक विशाल दादलानी आणि ए. आर. रहमान यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details