मुंबई- बॉलिवूडच्या ड्रग सेवनाबाबत सुरू असलेल्या तपासातील आरोपी क्षितीज प्रसाद याच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. क्षितीज प्रसाद हा धर्मा प्रॉडक्शनचा माजी कर्मचारी आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग सेवनाचा अँगल पुढे आला होता. यासंदर्भात नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) ने त्याला २६ सप्टेंबर रोजी अटक केले होते.
धर्मा प्रॉडक्शनच्या क्षितीज प्रसादच्या न्यायालयीन कोठडीत वाढ - क्षितीज प्रसाद ड्रग सप्लायर्सच्या संपर्कात
धर्मा प्रॉडक्शनचा माजी कर्मचारी क्षितीज प्रसाद याच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. आज त्याची एनडीपीएसच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यात त्याची न्यायालयीन कोठडीचा अवधी मंगळवारपर्यंत वाढवण्यात आला आहे.
क्षितीज प्रसाद
क्षितीज प्रसाद याची न्यायालयीन कोठडीची मुदत शनिवारी संपुष्ठात आली होती. आज त्याची एनडीपीएसच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यात त्याची न्यायालयीन कोठडीचा अवधी मंगळवारपर्यंत वाढवण्यात आला आहे.
एनसीबीने दावा केला आहे की, क्षितीज प्रसाद अनेक ड्रग सप्लायर्सच्या संपर्कात होता आणि तो स्वतःही ड्रग सेवन करीत होता. यामुळेच त्याला अटक झाली होती.