मुंबई - बॉलिवूड स्टार शिल्पा शेट्टी हिने शुक्रवारी जाहीर केले की पती राज कुंद्रा, मुलगा वियान-राज आणि मुलगी समिशा यांच्यासह तिच्या कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची बाधा झाला आहे.
तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट केलेल्या निवेदनात ४५ वर्षीय शिल्पा शेट्टीने सांगितले की तिच्या सासू-सासरे आणि आईलाही या विषाणूचा संसर्ग झालाआहे.
"शेवटचे १० दिवस आमच्यासाठी एक कुटुंब म्हणून कठीण होते. माझ्या सासऱ्यांची कोविड -१९ टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर समिशा, वियान-राज, माझी आई आणि शेवटी राज यांनाही कोरोनाची लागण झाली. सर्वजण क्वारंटाइनमध्ये राहात आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्या खोल्यांमध्ये ते उपचार घेत आहेत.'' असे शिल्पाने लिहिलंय.