महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

वांद्रे रेल्वे टपाल पाकिटाचे शाहरुख खानच्या हस्ते उद्घाटन - ऐतिहासिक वारसा

मुंबईतील वांद्रे स्थानक हे एक ऐतिहासिक वारसा लाभलेले अर्थात हेरिटेज स्थानकांपैकी एक आहे. अशा स्थानकाच्या टपाल पाकिटाचे उद्घाटन करण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल शाहरुखनं सर्वांचे आभारही मानले.

वांद्रे रेल्वे टपाल पाकिटाचे शाहरुख खानच्या हस्ते उद्घाटन

By

Published : Aug 23, 2019, 7:54 PM IST

मुंबई- वांद्रे रेल्वे स्टेशन या वास्तूच्या टपाल पाकिटाचे अनावरण हिंदी चित्रपट अभिनेता शाहरूख खान याच्या हस्ते आज वांद्रे स्थानकात करण्यात आले. या कार्यक्रमला शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार उपस्थित होते. यावेळी शाहरुख खानला पाहण्यासाठी वांद्रे स्थानकाबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

वांद्रे रेल्वे टपाल पाकिटाचे शाहरुख खानच्या हस्ते उद्घाटन

मुंबईतील वांद्रे स्थानक हे एक ऐतिहासिक वारसा लाभलेले अर्थात हेरिटेज स्थानकांपैकी एक आहे. अशा स्थानकाच्या टपाल पाकिटाचे उद्घाटन करण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल शाहरुखनं सर्वांचे आभार मानले. यासोबतच विनोद शैलीत आपल्या चित्रपटांतील रेल्वे स्थानकांचा संदर्भ देत त्यानं उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं.

ABOUT THE AUTHOR

...view details