भारतीयांना शहीद भगत सिंग यांच्याबद्दल माहित असले तरी त्यांचा शिष्य सरदार उधम सिंग बद्दल पंजाब पलीकडे फारसे माहित नाहीये. याच सरदार उधम सिंगच्या जीवनावर आधारित एक चित्रपट येतोय ज्याचे नाव आहे, ‘सरदार उधम’ ज्यात विकी कौशल प्रमुख भूमिकेत आहे. त्यांचा गुरु म्हणजेच शहीद भगत सिंगच्या भूमिकेत अमोल पराशर आहे, हे विकीने नुकतेच समाज माध्यमांवर कळविले. अभिनेता अमोल पराशर याने चित्रपटात शहीद भगत सिंहची अविश्वसनीय भूमिका साकारताना, या क्रांतिकारकाला अत्यंत ईमानदारीने आणि आवेशपूर्ण पद्धतीने साकारले आहे, असे विकी म्हणाला.
गुरु आणि एक सच्चा मित्र शहीद भगत सिंह, सरदार उधम सिंह यांचे महत्वाचे सहयोगी आणि गुरुंपैकी एक होते. आता जेव्हा प्रेक्षक भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या शोधातील एक चित्तवेधक अध्याय उलगडण्यासाठी सज्ज झाला आहे. सोशल मीडिया कॅप्शनमध्ये विकी कौशलने लिहिले की: "माझा गुरु, मझा मित्र, माझा भाऊ...माझा भगत्या! सादर करीत आहे शहिद भगतसिंगच्या भूमिकेत अमोल पराशर. ही मैत्री आपण साकारतो., अमोल."