मुंबई- अभिनेत्री-चित्रपट निर्माती पूजा भट्ट हिने बॉलिवूड अभिनेता फराझ खानच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. तिने लिहिलंय की, त्याची प्रकृती हळूहळू सुधारत आहे. १४ ऑक्टोबर रोजी फराझ याच्या मेंदूत इन्फेक्शन झाले होते, हे इन्फेक्शन छातीपर्यंत पसरले होते.
फराझला बेंगळुरूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तो जीवन आणि मृत्यूशी संघर्ष करीत होता. आता पूजा भट्ट हिने त्याच्या प्रकृतीविषयी माहिती देताना त्याच्या वैद्यकीय उपचारासाठी निधी उभारून मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.