महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अभिनेत्री गहना वशिष्ठने सई ताम्हणकरवर केला होता गौप्यस्फोट.. काय आहे राज कुंद्रा कनेक्शन - Sai Tamhanka latest news

''मी काय किंवा राज कुंद्रा काय यांनी कधीही पॉर्न फिल्म बनविली नाही. आमचे कन्टेन्ट हे बोल्ड किंवा वयस्कांसाठीच्या श्रेणीमध्ये मोडते. आम्ही कधीही नग्नता दर्शविली नाही जी पॉर्न फिल्म्समध्ये दाखविली जाते. आमचे चित्रपट किंवा लघुपट हे तितकेच बोल्ड आहेत जितके की अन्य ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील, उदा. नेटफ्लिक्स, अल्ट बालाजी इत्यादीवर., चित्रपट असतात.'', असे अभिनेत्री गहना वशिष्ठ हिने म्हटले आहे. राज कुंद्राच्या चित्रपटांत काम करण्यासाठी सई ताम्हणकरला सुद्धा विचारण्यात येणार होतं, असेही गहना म्हणाली.

Raj Kundra case
राज कुंद्रा प्रकरण

By

Published : Jul 24, 2021, 5:14 PM IST

Updated : Aug 2, 2021, 3:25 PM IST

गेल्या काही दिवसापासून राज कुंद्राच्या पॉर्न फिल्म्स निर्मितीसाठी त्याला झालेल्या अटकेबाबत सर्वत्र चर्चा आहे. राज, अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा असल्याकारणाने संपूर्ण देशच, त्याच्याबद्दल उलटसुलट भाष्य करीत आहे. त्यातच आता शिल्पा शेट्टीची सुद्धा चौकशी सुरु झाली असून तिने या सर्व प्रकरणाबद्दल अनभिज्ञता दर्शविली आहे. साहजिकच राज कुंद्रा तिचा नवरा असल्याकारणाने तिने त्याच्या बाजूने उभे राहणे गैर नाही. फक्त एक व्यक्ती, जी बाहेरची आहे असे म्हणता येईल, राज कुंद्रा निर्दोष आहे असे म्हणतेय ती म्हणजे अभिनेत्री गहना वशिष्ठ.

आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांच्यासोबत बोलताना गहना म्हणाली, ‘राज कुंद्राला ज्या कलामांखाली (भा दं सं २९२, २९३) अटक केली तो जामीनपात्र गुन्हा आहे. मलादेखील त्याच कलमांखाली अटक करण्यात आली होती. ५ महिन्यांच्या तुरुंगवासानंतर सध्या मी जामिनावर बाहेर आलेय. मी काय किंवा राज कुंद्रा काय यांनी कधीही पॉर्न फिल्म बनविली नाही. आमचे कन्टेन्ट हे बोल्ड किंवा वयस्कांसाठीच्या श्रेणीमध्ये मोडते. आम्ही कधीही नग्नता दर्शविली नाही जी पॉर्न फिल्म्समध्ये दाखविली जाते. आमचे चित्रपट किंवा लघुपट हे तितकेच बोल्ड आहेत जितके की अन्य ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील, उदा. नेटफ्लिक्स, अल्ट बालाजी ई., चित्रपट असतात. मी असे नाही म्हणत की त्यांनाही अटक व्हायला हवी परंतु आम्हालाच का अशी वागणूक दिली जातेय?’

गहना वशिष्ठ काही मुलाखतीत असे म्हटले होते की राज कुंद्राच्या चित्रपटांत काम करण्यासाठी सई ताम्हणकरला सुद्धा विचारण्यात येणार होतं. आमच्या प्रतिनिधींनी सईला काँटॅक्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु ती मुंबई बाहेर शूटिंग करीत असून तिथे मोबाईल रेंजचा प्रॉब्लेम आहे. परंतु सई ताम्हणकर यावर नक्कीच आपली बाजू मांडेल हे नक्की. तसं पाहायला गेलं तर सई ताम्हणकर ही मराठी आणि हिंदीतील खूप मोठी स्टार आहे. ती मराठीमध्ये सुपरस्टार अशी बिरुदावली मिरवते आणि ‘अशा’ चित्रपटांसोबत तिचे नाव जोडले जाणे म्हणजे तिच्या स्टारडमवर आघात आहे. सईने आतापर्यंत भलेही बऱ्यापैकी प्रक्षोभक भूमिका (उदा. नुकतीच प्रदर्शित झालेली वेब सिरीज ‘समांतर २’) साकारल्या असोत परंतु तिला राज कुंद्राच्या चित्रपटांतून असे ‘बोल्ड’ रोल करण्याची गरज पडणारच नाही असे तिच्या निकटवर्तीयांनी छातीठोकपणे सांगितले.

या संदर्भात विचारल्यावर गहना वशिष्ठ म्हणाली, ‘मी जे काही बोलले ते खरे आहे. मी असे कधीच म्हटले नाही की सई ताम्हणकर राज कुंद्राची फिल्म करीत होती वा करणार होती. परंतु इथे एक गोष्ट महत्वाची आहे ती अशी की राज कुंद्राने आधीची हॉटशॉट ही साईट बंद केली होती आणि ‘बॉलिफिल्म’ नावाची साईट सुरु करणार होता. परंतु या नवीन साईटवर कुठलेही अश्लील चित्रपट दाखविले जाणार नव्हते. ‘बॉलिफिल्म’ ही पूर्णतः ‘नॉन-बोल्ड’ ॲप म्हणून पुढे येणार होते. मी स्वतः या ॲप वर चित्रपट दिग्दर्शित करणार होते आणि त्याच संदर्भात सई ताम्हणकरचे नाव मी घेतले होते. मी पुन्हा एकदा सांगते की या ॲप वर कोणतेही अश्लील कन्टेन्ट असणार नव्हते. आमच्या मिटींग्समध्ये सईच्या नावाची चर्चा झाली होती परंतु मी कधीही सई शी बोललेली नाहीये कारण मी फक्त टेक्निकल साईड सांभाळत होते. स्टार्सशी बोलणे, पेमेंट ठरविणे, करार करणे आदी गोष्टी उमेश कामत (मराठी अभिनेता नव्हे) सांभाळत असे. आमचा चित्रपट ॲडल्ट- कॉमेडी जॉनरचा होता. आणि पुढे सांगायचं झालं तर नुसती सई ताम्हणकरच नव्हे तर आम्ही शमिता शेट्टी (शिल्पा शेट्टी कुंद्राची बहीण) आणि टेलिव्हिजन अभिनेत्री सारा खान यांच्या नावांची पण चर्चा केली होती. मी एकूण ३ चित्रपटांचे दिग्दर्शन करणार होते आणि त्यामुळे या तीन अभिनेत्रीची नावे आमच्यातर्फे शॉर्ट-लिस्ट झाली होती.’

गहना वशिष्ठच्या या स्पष्टीकरणानंतर अभिनेत्री सई ताम्हणकरच्या नावाने उठलेला गदारोळ शमेल ही आशा.

हेही वाचा - तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचे पुनर्वसन करू - मुख्यमंत्री

Last Updated : Aug 2, 2021, 3:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details