मुंबई- अष्टपैलू अभिनेता आयुष्मान खुराणा अभिनयाशिवाय एक उत्तम लेखक आणि गायकही आहे. त्याने आपल्या पहिल्याच विकी डोनर सिनेमातील 'पानी दा रंग' या गाण्याला आवाज दिला होता. या गाण्याला आणि आयुष्मानच्या मधुर आवाजाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.
आयुष्मानच्या आवाजातील 'एक मुलाकात' गाणं प्रदर्शित - dream girl songs
आयुष्मनाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ड्रीम गर्ल सिनेमातील गाण्यालाही त्यानं आवाज दिला आहे. एक मुलाकात असं या गाण्याचं शीर्षक असून आयुष्मानच्या आवाजातील हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे
अशात आता आयुष्मनाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ड्रीम गर्ल' सिनेमातील गाण्यालाही त्यानं आवाज दिला आहे. 'एक मुलाकात' असं या गाण्याचं शीर्षक असून आयुष्मानच्या आवाजातील हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन गाण्याची लिंक शेअर करत त्यानं याला कॅप्शनही दिलं आहे.
वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांसाठी आणि प्रेमासाठी आभारी आहे. हेच प्रेम माझ्याकडून तुमच्यासाठी...'एक मुलाकात'चं माझ्या आवाजातील अनप्लगड व्हर्जन, असं त्यानं कॅप्शनमध्ये म्हटलं. दरम्यान, या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी या सिनेमानं १०.०५ कोटींचा गल्ला जमवला.