महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मला माझी वन्यजीव आवड पुन्हा जोपासायला नक्की आवडेल - आयुष्मान खुराना - अभिनेता आयुष्मान खुराना

आयुष्मान खुराना हा प्रामुख्याने अशा चित्रपटांतून प्रेक्षकांना सामोरा गेला व त्यामुळेच तो बॉलिवूडच्या आशयघन चित्रपटांचा ‘पोस्टर बॉय’ म्हणून ओळखला जातो. आयुष्मान सध्या भारताच्या ईशान्य प्रांतात शूटिंगच्या निमित्ताने गेला असून तो अनुभव सिन्हाच्या ‘स्पाय थ्रिलर’ अनाम चित्रपटात काम करतोय.

Ayushman Khurana
अभिनेता आयुष्मान खुराना

By

Published : Jan 30, 2021, 6:02 AM IST

भारतातील बॉलिवूडमध्ये फारच थोडे आशयघन चित्रपट बनतात कारण अजूनही प्रेक्षक ‘स्टार्स व मसाला’ यालाच प्राधान्य देतात. गेल्या काही वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीतही थोडेफार आशयघन चित्रपट बनू लागले आहेत व त्यातील बरेच व्यावसायिकदृष्ट्या यशस्वीही झाले. आयुष्मान खुराना हा प्रामुख्याने अशा चित्रपटांतून प्रेक्षकांना सामोरा गेला व त्यामुळेच तो बॉलिवूडच्या आशयघन चित्रपटांचा ‘पोस्टर बॉय’ म्हणून ओळखला जातो. आयुष्मान सध्या भारताच्या ईशान्य प्रांतात शूटिंगच्या निमित्ताने गेला असून तो अनुभव सिन्हाच्या ‘स्पाय थ्रिलर’ अनाम चित्रपटात काम करतोय. आयुष्मान आणि अनुभव यांनी याआधी ‘आर्टिकल १५’ मधून एकत्र काम केले होते व या आशयघन चित्रपटाला व्यावसायिक यशसुद्धा मिळाले होते.

अभिनेता आयुष्मान खुराना

हेही वाचा -अनन्या पांडेचा हॉट अंदाज पाहिलात का?

भारताचा ईशान्य भाग तेथील जंगल व वन्य प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. आयुष्मान ने नुकतीच आसाम मधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला नुकतीच भेट दिली. तेथील ‘सफारी’ मध्ये निसर्गसौंदर्य आणि वन्यजीव प्राणी बघून त्याच्या डोळ्यांचे पारणे फिटले. त्याच्यामते तो श्वास रोखणारा अनुभव होता. आयुष्मान म्हणतो, “मी नेहमीच वन्यजीव प्राण्यांबद्दल उत्साही होतो परंतु ती आवड हल्ली जोपासायला मिळत नाही. मला ‘सफारी’ वर जाण्याची संधी मिळाली व मी एका पावलावर तयार झालो. मी काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये गेलो आणि मला मान्य करायला हवे की हा प्रचंड अदभूत अनुभव होता. गेंडे, हरणं, हत्ती ई. प्राणी शोधून ‘क्लिक’ करण्यात खूप मजा आली. माझ्यातील लहान मूल जागं झालं होतं जणू.”

अभिनेता आयुष्मान खुराना

आयुष्मान पुढे म्हणाला, “मी नेहमीच आपल्या देशाच्या समृद्ध विविधतेमुळे अचंबित होतो आणि वाटते की आपल्याच देशामध्ये इतके विलोभनीय व आश्चर्यचकित करणारे ‘टुरिस्ट स्पॉट्स’ आहेत त्याचा लाभ सर्वांनी उठवायला हवा. काझीरंगा चा हा अविश्वसनीय अनुभव माझ्या स्मरणात कायम राहील.”

“मी यापूर्वी मुदुमलाई वन्यजीव अभयारण्य येथेदेखील गेलो होतो आणि तिथेही मला असाच अविश्वसनीय व मनोरंजक अनुभव आला होता. त्या नक्कीच आयुष्यभर टिकून राहतील अशा स्पेशल आठवणी आहेत. काझीरंगाला भेट दिल्यानंतर मला हे मान्य करावेच लागेल की मला येत्या काळात वन्यजीवांविषयी असलेल्या माझ्या आवडीची भावना पुन्हा जागवायला नक्कीच आवडेल”, आयुष्मान खुरानाने आपले मन मोकळे करत सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details