मुंबई- बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुराना हा आज एक ब्रॅण्ड आहे आणि त्याने आपल्या यशाचे श्रेय स्वत: ला न बदलण्याच्या क्षमतेला दिले आहे. आयुष्मान म्हणतो, "मला असे वाटते की, प्रवाहाच्या विरुद्ध काम करण्याचा आणि मी जसा आहे, तसाच राहण्याचा माझा निर्णय झाला आहे. खऱ्या आयुष्यात मी जसा आहे त्या व्यक्तिमत्वाशी मी प्रामाणिक राहिलो आहे.
तो पुढे म्हणाला, "मला विश्वास आहे की देशाला आता सामाजिक विषयांबद्दल मुक्तपणे बोलायचे आहे. माझे भाग्य आहे की, प्रेक्षकांना माझ्या चित्रपटाचा ब्रँड आवडला, ते त्याच्याशी चिकटून राहिले आणि त्यांनी आपल्या भावना माझ्या भावनांशी जोडून पाहिल्या. आज लोकांना माझी जी क्षमता पाहायला मिळत आहे ती यामुळे आहे की, एक माणूस म्हणून मी माझ्या विचाराबद्दल निडर राहिलो आहे. या गोष्टींवर विश्वास नसणारा मी असतो तर लोकही माझ्याशी संबंध ठेवू शकले नसते. ''