महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

''मी १४ वर्षाची असताना माझे लैंगिक शोषण झाले,'' आमिर खानची मुलगी इराचा धक्कादायक खुलासा - Ira Khan latest news

आमिर खानची मुलगी इरा खानने काही दिवसापूर्वी आपण डिप्रेशनमध्ये असल्याचे सांगितले होते. आता तिने एक व्हिडिओ शेअर करुन आयुष्यातील अनेक घटनांचा खुलासा केलाय. यात तिने आपले १४ वर्षाची असताना लैंगिक शोषण झाल्याचाही खुलासा केलाय.

Ira Khan, daughter of Aamir Khan
आमिर खानची मुलगी इरा खान

By

Published : Nov 2, 2020, 8:11 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान नुकतीच सोशल मीडियावर ‘वर्ल्ड मेंटल हेल्थ डे’ या विषयावर तिचे डिप्रेशनबद्दल एक पोस्ट शेअर केल्यामुळे चर्चेत आली होती. एक व्हिडिओ शेअर करताना इरा खान म्हणाली होती की. मी उदास आहे. त्यानंतर सोशल मीडियावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता पुन्हा एकदा इरा खानने आपल्या यूट्यूब चॅनलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये इरा खान आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक रहस्ये उलगडताना दिसत आहे. इरा खान स्वतः डिप्रेशनमध्ये का गेली हे सांगत आहे.

व्हिडिओमध्ये इरा खान असे म्हणते, ''बऱ्याच लोकांनी मला विचारले की तू डिप्रेशनमध्ये का आहेस. या गोष्टीचे उत्तर माझ्याकडे नाही, कारण मलाच हे माहिती नाही. गेल्या अनेक वर्षापासून हे समजून घेण्याचा मी प्रयत्न करीत आहे. परंतु स्पष्ट उत्तर मिळालेले नाही. आज मी तुम्हाला माझ्या जीवनाबद्दल सांगू इच्छित आहे. मला कधीही पैशांचा त्रास झाला नाही. माझ्याकडे एक सपोर्ट सिस्टम आहे. माझे पालक, माझे मित्र, त्यांनी मला कधीही कोणत्याही गोष्टीचा दबाव आणला नाही. मला माहीत आहे की माझ्या आयुष्यात काही घडलं तर मी माझ्या पालकांकडे जाऊन त्यांच्याशी बोलू शकेन."

व्हिडिओमध्ये इरा खान डिप्रेशनमध्ये जाण्याची गोष्ट सांगते, "मी स्वत: ची काळजी घेणे थांबविले. मी खूप झोपायला लागले. मला आयुष्यात जगू नये या बहाण्याने झोपायला लागले. मी आधी बर्‍यापैकी व्यग्र असायचे, नंतर हळू हळू मी बिछान्यातून बाहेर पडत नव्हते. मी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये भाग घ्यायचे. नंतर मी भाग घेणे थांबवले. त्यानंतर मी मित्रांशी बोलणे थांबवले. कारण माझा मुड दिवसेंदिवस खराब होत गेला होता.''

''मी संगीत ऐकू देखील शकत नाही कारण त्यामध्येही आपण स्वत: बरोबर असावे लागते. म्हणून मला टीव्ही पहावा लागत होता ज्यामुळे मी स्वत: ला गुंतवून टाकेन आणि मला रडू येणार नाही. माझे औदासिन्य खूप मोठे होते कारण मी पटकन रडणारी एखादी व्यक्ती नाही. मी १७ वर्षांनंतर रडायला सुरुवात केली. हळूहळू रडणे वाढत गेले, हे केव्हाही घडत असे पण कोणतेही कारण नव्हते. मला काय करावे हे माहित नव्हते म्हणून मी धावत बाथरूममध्ये जायचे. मी का रडतोय हे मला कळलत नसे. "

व्हिडिओमध्ये इरा खान पुढे म्हणते, "मी लहान असताना माझ्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता, परंतु मला त्यातून धक्का बसला, असे काही झाले नाही. माझे आई वडिल अजूनही खूप चांगले मित्र आहेत आणि कुटुंब विखुरलेले नाही. मी १४ वर्षाची असताना माझे लैंगिक शोषण झाले होते.''

''काय घडतंय हे मला कळत नव्हते. पण जेव्हा मला कळले तेव्हा मी त्यापासून दूर गेले. हे माझ्यासोबत मी का घडू दिले याबद्दल मला वाईट वाटले. पण हाही माझ्या आयुष्यातला मोठा धक्का नव्हता की ज्यामुळे मी डिप्रेशनमध्ये जाईन. माझी घुसमट होत आहे, मी रडत आहे, हे मी मित्रांना आणि आई वडिलांना सांगू शकते, पण काय सांगू. ते मला विचारतील की, का? तर मी त्यांना काय सांगणार. माझ्यासोबत काहीच वाईट घडलेले नाही, जसे मला वाटते. यामुळे मी त्यांच्याशी बोलण्यास टाळले आहे.''

ABOUT THE AUTHOR

...view details