महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बीग बी यांना चुकून जखमी केल्यामुळे सात-आठ सिनेमे सोडावे लागले - पुनित इस्सार - पुनित इस्सार यांच्या फाईटमउळे बच्चन जखमी

कुली चित्रपटाच्या फाईट सीनमध्ये अमिताभ बच्चन यांना मोठी जखम झाली होती. पुनित इस्सार यांच्या चुकून बसलेल्या फाईटमुळे हा अपघात घडला होता. हा प्रसंग आठवताना पुनित इस्सार यांनी बच्चन यांची रुग्णालयातील भेटीचा प्रसंग सांगितला.

Big B: Puneet Issar
अमिताभ बच्चन

By

Published : Jul 23, 2020, 7:27 PM IST

मुंबई - १९८३ च्या ‘कुली’ चित्रपटाच्या सेटवर चुकून अमिताभ बच्चन यांना गंभीर जखम झाली होती. अभिनेता पुनित इस्सार यांनी चुकून मारलेल्या फाईटमुळे अमिताभ यांना जखम झाली होती. त्यानंतर पुनित यांना सात ते आठ चित्रपट गमवावे लागले होते. मात्र, अमिताभ यांनी ही गोष्ट अत्यंत दयाळूपणे घेतल्याची आठवण पुनित इस्सार याने सांगितली आहे.

"अमिताभ बच्चन यांच्याशी माझी चकमक होणे दुर्दैवी होते. मला आठवते की कुलीची शूटिंग करताना आम्हाला हा विशिष्ट सीन क्रमा क्रमाने करायचा होता. फायनल टेकच्यावेळी नीट जुळवाजुळव झाली नाही आणि चुकून बच्चन जखमी झाले.", असे इस्सार यांनी सांगितले.

२६ जुलै १९८२ रोजी, मनमोहन देसाई यांच्या कुली चित्रपटाचे शूटिंग बंगळुरूमध्ये सुरू होते. इस्सार यांनी एक खोटी फाईट बच्चन यांना मारायची होती आणि त्यानंतर बिग बी यांनी जवळच्या लोखंडी टेबलला धडकायचे होते. दुर्दैवाने हा शॉट चुकीचा झाला आणि टेबलाच्या कोपऱ्याची बिग बी यांच्या ओटीपोटात जोरदार धडक बसली. परिणामी त्यांना जखम झाल्यामुळे त्यांना अनेक महिने रुग्णालयात उपचार घ्यावे लागले.

हा प्रसंग आठवताना इस्सार यांनी सांगितले, ते खूप दयाळू आहेत. त्यांना माहिती होते की मी घाबरलो आहे आणि मी जेव्हा रुग्णालयात भेटायला गेलो तेव्हा त्यांनी मला अभिवादन केले. ते म्हणाले की मी कोणत्या प्रसंगातून गेलो असेल हे त्यांना जाणवलं, कारण असाच एक अपघात बच्चन आणि विनोद खन्ना यांच्यात झाला होता. त्यात विनोदजी चुकून जखमी झाले होते आणि त्यांच्या कपाळाला आठ टाके पडले होते.

हेही वाचा - जॅझ गायिका, अभिनेत्री अ‍ॅनी रॉस यांचे निधन, नव्वदी पूर्ण व्हायला चार दिवस बाकी

बिग बीची अवस्था पाहून सुरुवातीला भयभीत झालेले इस्सार म्हणाले :" पण ते महान माणूस आहेत, त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि आमच्यात कोणतेही कटूता नसल्याचे सर्वांना दाखविण्यासाठी मला गेटपर्यंत चालवले. माझ्या बायकोने त्यांच्यासाठी रक्तदानही केले होते.

घटनेनंतरही काम मिळाले नाही याविषयी बोलताना इस्सार म्हणाले: "या घटनेनंतर मी जवळपास सात ते आठ चित्रपट गमावले. (टीव्ही शो) महाभारतात सुरुवातीला मला भीमच्या भूमिकेसाठी बोलविण्यात आले होते. पण दुर्योधनच्या भूमिकेसाठी मी उत्सुक होतो. मी दुर्योधन यांचे संवाद वाचले आणि भूमिका मिळवली. बाकीचा इतिहास सर्वांना माहिती आहे. "

झी टीव्हीचा गायन रिअ‍ॅलिटी शो 'सा रे गा मा पा लीटल चँप्स'च्या एपिसोड दरम्यान इस्सार यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details