मुंबई- अभिनेत्री कंगना रणौत हिच्यासोबत माझी वैयक्तिक शत्रुत्व नसून तिने केलेल्या सततच्या नाहक, बदनामीकारक वक्तव्यामुळे महाराष्ट्राची, महाराष्ट्राच्या मराठी माणसाची व मुंबई पोलिसांची बदनामी झाल्यामुळे मला नाईलाजास्तव तिच्या विरोधात बोलावे लागले, असे मराठमोळी बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने म्हटले आहे. ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी महेश बागल यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत उर्मिला मातोंडकर हिने दिलखुलास उत्तर दिली आहेत.
उर्मिला मातोंडकरशी बातचित काँग्रेस मध्ये काही जनांसोबत झाले होते मतभेद
काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर उर्मिला मातोंडकर हिने 2019ची लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत तिचा पराभव झाल्यानंतर काँग्रेस पक्षातील काही ही नेत्यांसोबत तिचे वैचारिक मतभेद झाले होते. या वैचारिक मतभेदांमुळे मी काँग्रेस पक्ष जरी सोडला होता तरी राजकारण सोडले नसल्याचे ऊर्मिला मातोंडकरने म्हटले आहे.
हेही वाचा - हिना खानने मालदिवच्या सुट्टीत केली 'नाईट मोड' फोटोग्राफी
समाजसेवेचे घरातूनच बाळकडू
माझे वडील हे राष्ट्रीय सेवा दलामध्ये काम करत होते. त्यामुळे समाजकार्याचे बाळकडू हे मला माझ्या घरातूनच मिळाले आहे. माझ्या घराची पार्श्वभूमी ही सुशिक्षित असल्यामुळे लोकांचे प्रश्न कशा प्रकारे सोडवले जाऊ शकतात याची जाणीव मला आहे. काही जणांसोबत माझे मतभेद झाल्यानंतर मी काँग्रेस पक्ष सोडला होता. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला फोन करून साहित्य-कला क्षेत्रात असलेल्या व्यक्तींची आम्हाला गरज असून आपण विधान परिषदेवर यावे, असे सांगितल्यानंतर आपण त्यांना होकार कळविला होता.
हेही वाचा - अलिबागच्या समुद्रात दीपिका पदुकोणने सिध्दार्थ चतुर्वेदीसोबत घेतला सनसेटचा आनंद
महिलांच्या प्रश्नांसाठी करणार काम
विधान परिषदेवर नियुक्ती झाल्यानंतर आपण महिलांचे आरोग्य, त्यांचे शिक्षण व महिलांशी संबंधित इतर गोष्टींसाठी लढा देणार असल्याचे उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलेले आहे. मराठी माणूस , मराठी अस्मिता अशी शिवसेनेची ओळख आहे. महिलांना शिवसेना पक्षात एक वेगळे स्थान देण्यात आले असून शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी वेळोवेळी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडून न्याय व हक्कासाठी लढा दिलेला आहे. कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये शिवसैनिकांनी धारावी सारख्या परिसरात जाऊन स्वतःच्या जिवाची बाजी लावून संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावला होता, असे ऊर्मिला मातोंडकर यांनी म्हटले आहे.