मुंबई- सुशांतसिंह राजपूत प्रकरणी ईडी व मुंबई पोलिसांकडून तपास केला जात असताना सुशांतसिंहची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिने या संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. मी आदित्य ठाकरे यांना कधीही भेटले नसल्याचे तिने म्हटले आहे. याबरोबरच आदित्य ठाकरे यांचा या गोष्टीशी कुठलाही संबंध नसल्याचेही रिया चक्रवर्ती हिचे वकिल सतीश माने-शिंदे यांनी त्यांच्या सोशल अकाउंटवर पोस्ट करत म्हटले आहे.
रिया चक्रवर्तीचे आदित्य ठाकरें बाबत मोठे वक्तव्य, म्हणाली... - राजपूत प्रकरणी ईडी व मुंबई पोलिसांकडून तपास
सुशांतसिंहची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिने, मी आदित्य ठाकरे यांना कधीही भेटले नसल्याचे म्हटले आहे. याबरोबरच आदित्य ठाकरे यांचा या गोष्टीशी कुठलाही संबंध नसल्याचेही रिया चक्रवर्तीचे वकिल सतीश माने शिंदे यांनी त्यांच्या सोशल अकाउंटवर पोस्ट करुन म्हटले आहे.

रिया चक्रवर्ती हिने असे म्हटले की, मुंबई पोलीस व ईडीला सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक, फॉरेन्सिक वैद्यकीय अहवाल, बँक अहवाल, इन्कम टॅक्स परतावा, सीसीटीव्ही फुटेज याबरोबर माझ्या मोबाईलचा सीडीआर इलेक्ट्रॉनिक डेटा दोन्ही यंत्रणांना दिला आहे.
दरम्यान, सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत विरोधी याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडून या प्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे याचे नाव घेण्यात आले होते. मात्र, यावर स्वतः आदित्य ठाकरे यांनी समोर येऊन या प्रकरणाशी आपला काडीमात्र संबंध नसल्याचेही स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतरही आदित्य ठाकरे यांच्या नावावरुन विरोधकांकडून चिखलफेक होत होती. या पार्श्वभूमीवर रिया चक्रवर्तीने हा खुलासा करत आपण आदित्य यांना कधीही भेटले नसल्याचे म्हटले आहे.