मुंबई- दोन वर्षांपूर्वी बनलेला 'अंधाधुन' हा चित्रपट अभिनेत्री राधिका आपटेसाठी नेहमी खास राहील. तिला वाटतं की, या चित्रपटाच्यावेळी तिच्यासारखा विचार करणाऱ्या लोकांसोबत काम करण्याची संधी मिळाली.
राधिका म्हणाली, "'अंधाधुन' माझ्यासाठी खूप मनाच्या जवळचा चित्रपट आहे. यामुळे मला माझ्यासारखा विचार करणाऱ्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी मला प्रोत्साहित केले आणि कामाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी मदत केली. श्रीराम राघवन सारखा दिग्दर्शक आणि आयुष्मान खुरानासोबत सहकलाकार म्हणून काम करण्याचा आणि शिकण्याचा अनुभव मिळाला."