मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्तीच्या विरोधात सुशांतच्या वडिलांनी तक्रार नोंदवली. यासंदर्भात बिहार पोलिसांकडून तपास केला जात आहे. मात्र, यापूर्वी अटक टाळण्यासाठी रिया चक्रवर्ती हिने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर रिया चक्रवर्ती ही पुन्हा एकदामाध्यमांसमोर आलेली आहे.
माझा कायद्यावर व देवावर विश्वास, रियाने केला व्हिडिओ प्रसारित - रिया चक्रवर्ती हिने सुप्रीम कोर्टात
सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर या प्रकरणी अटक टाळण्यासाठी रिया चक्रवर्ती हिने सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल केल्यानंतर या संदर्भात पुन्हा एकदा रिया चक्रवर्ती ही माध्यमांसमोर आलेली आहे. तिच्या विरोधात इलेक्ट्रॉनिक मीडिया व इतर माध्यमांमध्ये खूपच वाईट व भयानक गोष्टी पसरवल्या जात आहेत. या संदर्भात रिया चक्रवर्ती हिच्या वकिलांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यास मनाई करण्यात आल्यामुळे या कुठल्याही गोष्टींवर प्रतिक्रिया देणार नाहीये, अस रिया चक्रवर्तीने व्हिडिओत म्हटले आहे.
एका व्हिडिओच्या माध्यमातून रिया चक्रवर्तीने तिची बाजू ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्हिडिओमध्ये तिने म्हटलेलं आहे की, तिच्या विरोधात इलेक्ट्रॉनिक मीडिया व इतर माध्यमांमध्ये खूपच वाईट व भयानक गोष्टी पसरवल्या जात आहेत. यासंदर्भात रिया चक्रवर्ती हिच्या वकिलांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यास मनाई करण्यात आल्यामुळे या कुठल्याही गोष्टींवर प्रतिक्रिया देणार नाहीये, अस रिया चक्रवर्तीने म्हटले आहे. मला देशाच्या कायद्यावर व देवावर विश्वास आहे आणि सत्याचा विजय होईल, असं म्हणत तिने हा व्हिडिओ प्रसारित केलेला आहे.
दरम्यान रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती या दोघांच्या विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल केला असून रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती हे संचालक पदावर असलेल्या कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारावर तपास करण्यासाठी ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समोर येत आहे.