नवी दिल्ली- अभिनेत्री सोनम कपूरचे एक ट्विट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. सोनमने ब्रिटीश एअरवेजवर बेजबाबदारपणाचा आरोप केलाय. तिच्या ट्विटला अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. भविष्यात ब्रिटीश एअरवेजच्या विमानतून प्रवास करणार नसल्याचे सोनमने ट्विटमध्ये म्हटले आहे.
ब्रिटीश एअरवेजवर भडकली सोनम कपूर... जाणून घ्या कारण - Sonam Kapoor latest news
सोनम कपूरने या महिन्यात तिसऱ्यांदा ब्रिटीश एअरवेजच्या विमानातून प्रवास केला. परंतु तिला वाईट अनुभव आल्याचे तिने ट्विट करीत सांगितले आहे.
सोनम कपूर
सोनमने ब्रिटीश एअरवेजला टॅग करीत पोस्टमध्ये लिहिलंय, ''या महिन्यात मी तिसऱ्यांदा ब्रिटीश एअरवेजमधून प्रवास केला आणि दोनदा माझी बॅग हरवली. मी हे शिकलेय की, यापुढे ब्रिटीश एअरवेजमधून कधीच प्रवास करणार नाही.'' सोनमचे हे ट्विट सध्या व्हायरल झाले आहे.
कामाच्या पातळीवर विचार करता सोनम 'द जोया फॅक्टर' या चित्रपटात झळकली होती. त्यापूर्वी तिचा 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सोनम सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.