मुंबई - अभिनेता ताहिर राज भसीन त्याच्या आगामी ‘लूप लपेटा’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यास उत्सुक झाला आहे. तो म्हणतो की त्याच्यासाठी 'रोल साउंड, कॅमेरा आणि अॅक्शन' हे शब्द ऐकणे एखाद्या जादुपेक्षा कमी नाही.
ताहिर म्हणाला, "मी चित्रपटाच्या सेटवर परत आल्याचा मला आनंद झाला आहे. 'रोल साउंड, कॅमेरा आणि अॅक्शन' यासारखे जादू करणारे शब्द ऐकण्यापेक्षा चांगली गोष्ट नाही. स्क्रिप्ट वाचणे आणि इतर तयारी आम्ही काही महिन्यापासून व्हॉट्सअप आणि झूमच्या माध्यामातून केली आहे. परंतु क्रूला भेटणे आणि पहिल्यासारखे वागणे याची तुलना व्हर्चुअल मिटींग्सशी होऊ शकत नाही.''
या चित्रपटात तो तापसी पन्नूसोबत काम करत आहे. ताहिरने सांगितले की, ''शूटिंगच्या पहिल्या दिवशी सर्व कलाकार आणि क्रू मेंबर्स एकमेकांना भेटण्यासाठी खूप आनंदी आणि उत्साही होते. "लूप लपेटा''च्या सेटवर पहिल्याच दिवशी खळबळ उडाली होती. आम्ही सगळेच शूट करण्यास उत्सुक होतो. सेट्सवर आश्चर्यकारक उर्जा होती. निर्माते तनुज गर्ग आणि अतुल कसबेकर, आमचे नवोदित दिग्दर्शक आकाश भाटिया या सर्व टीमचे उर्जा कमालीची होती. "