हैदराबाद :बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. हैदराबादच्या सिटी सिव्हिल कोर्टाने ( Hyderabad Civil Court ) कंगना राणौतच्या आगामी रिअॅलिटी शो 'लॉक अप'च्या ( Kangana Ranaut show Lock Upp ) प्रदर्शनाला स्थगिती दिली आहे.
याचिकाकर्ते आणि उद्योगपती सनोबर बेग यांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे, ज्यामध्ये कंगनाच्या शो 'लॉक अप'चे स्वरूप याचिकाकर्त्याच्या रजिस्टर आयडिया 'द जेल'च्या स्क्रिप्टशी जुळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. सनोबर बेग यनी 'द जेल' हा शो विकसीत केला होता आणि त्याची रितसर नोंदणीही केली होती. याच शोवर आधारित कंगना होस्ट करीत असलेला 'लॉक अप' हा शो आहे.