मुंबई - दिग्गज लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता बासू चटर्जी यांच्या निधनानंतर संपूर्ण मनोरंजन जगत दुःखी झाले आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या आठवणी जागण्याचा प्रयत्न केलाय सोशल मीडियावर असंख्य कलाकारांनी लाडक्या बासूदांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अमिताभ बच्चन यांनी लिहिलंय, ''बासू चटर्जींच्या निघून जाण्याने दुआ आणि संवेदना...शांत, विनम्र आणि चांगला माणूस...त्यांचे चित्रपट मध्यम वर्गीयांच्या आयुष्यावर भाष्य करीत असत. त्यांच्यासोबत मंझील चित्रपट केला होता...दुःखद नुकसान...ते नेहमी 'रिम झिम गिरे सावन' या गाण्यामुळे आठवत राहतील.''
ज्येष्ठ कलावंत अनुपम खेर यांनी आपला एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यांनी म्हटलंय, ''काही लोकांच्या जाण्याने वाटते की, पूर्ण संस्थान निघून गेले.''
अनिल कपूर यांनी फोटो शेअर करुन बासू चटर्जींना आदरांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिलंय, ''नेहमी काळाच्या पुढे जाऊन विचार करणारा दिग्दर्शक...बासू चटर्जींची आठवण नेहमी येत राहिल.''
निर्माता शूजित सरकार यांनी बासूदांना श्रध्दांजली वाहताना लिहिलंय, ''माझी पहिली नोकरी बासू चटर्जी यांचा सहाय्यक म्हणून बंगाली मालिकेतून सुरू झाली. याचे शूटिंग नवी दिल्लीतील सीआर पार्कमध्ये झाले होते. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.''
शबाना आझमी यांनी लिहिलंय, ''बासू चटर्जी निघून गेल्याच्या बातमीने खूप दुःख झाले. ते सिनेमाचे स्तंभ होते. त्यांच्या 'स्वामी' 'अपने पराए' आणि 'जीना यहां' या तीन चित्रपटातून काम करण्याचे भाग्य मला लाभले, यामुळे मी नशिबवान आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.''
शबाना आझमी यांनी बासूदांना वाहिली श्रध्दांजली
बासूदांच्या पहिल्या 'सारा आकाश' या चित्रपटात भूमिका केलेल्या अभिनेत्री मधु चंदा यांनी ईटीव्हीसोबत बातचित करताना त्यांच्या व्यक्तीमत्वावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, ''बासू दा पहिला चित्रपट बनवताना कलाकारांपेक्षाही जास्त नर्व्हस होते. ते शांत स्वभावाचे होते आणि नेहमी फक्त कामाच्या गोष्टी बोलायचे. ते नेहमी आपल्या विचारात गर्क झालेले असायचे.''
कहानी चित्रपटाचे दिग्दर्शक सुजॉय घोष यांनीही त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.
इंडियन फिल्म अँड टेलीव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन (आईएफटीडीए) ने ट्विटरवर बासू चटर्जी यांना श्रध्दांजली वाहिली आहे. बासू चटर्जी यांनी छोटी सी बात, रजनीगन्धा, बातों बातों में, एक रुका हुआ फैसला,चक्रव्यूह, मंझिल, स्वामी, प्रियतमा, शौकिन, चमेली की शादी, प्रेम विवाह, चितचोर यासारख्या गाजलेल्या सुमारे पन्नास चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.