बॉलीवूडचा मॅचो मॅन ह्रतिक रोशन खासगी जीवनात परफ्यूमचा खूप मोठा चाहता आहे. खूप लोकांना माहित नसेल की ह्रतिक आपल्या प्रत्येक पात्रांसाठी वेगळा परफ्यूम निवडतो. त्याने आता पर्यंत केलेल्या प्रत्येक चित्रपटातील प्रत्येक पात्रांकरिता वेगळा परफ्यूम वापरला आहे. ह्रतिकने आपल्या पात्रा अनुसार प्रत्येक चित्रपटात वेगळ्या परफ्यूमचा वापर केला आहे आणि म्हणूनच या अभिनेत्याकडे परफ्यूमचा मोठा संग्रह आहे.
अभिनेता आपल्या आगामी "सुपर 30" चित्रपटामध्ये दमदार भूमिकेत दिसेल. या चित्रपटात ह्रतिक पटना मधील एक हुशार पण आर्थिक दृष्टीने मागासेलेला शिक्षक साकारत आहे. या चित्रपटात ह्रतिक कधी ही न पहिलेल्या रुपात दिसेल. सुपर ३० साठी या अभिनेत्याने बेयर्डो नावाच्या परफ्यूमचा उपयोग त्याच्या अद्वितीय भूमिकेसाठी केला आहे.