मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा प्रमुख सौरभ गांगुलीच्या जीवनावर आधारित बायोपिक निर्माण होणार आहे. गांगुलीच्या भूमिकेत पडद्यावर ह्रतिक रोशन दिसू शकेल.
सौरभ गांगुली बायोपिक : करण जोहरच्या सिनेमात 'हा' बॉलिवूड स्टार साकारणार 'दादा'ची भूमिका? - सौरभ गांगली बायोपिक
सौरभ गांगुलीच्या जीवनावर आधारित बायोपिक करण्याचा निर्णय करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने घेतला आहे. दादाच्या भूमिकेसाठी ह्रतिक रोशनचा विचार करण्यात आला.
सौरभ गांगली बायोपिक
मीडिया रिपोर्टनुसार करण जोहर यांनी सौरभ गांगुलीची भेट घेतली आणि बायोपिकवर चर्चा केली. यासंबंधी अनेक रंजक गोष्टी सांगितल्या जात असून दादाची भूमिका ह्रतिक रोशन साकारणार अशीही चर्चा आहे.
एम एस धोनी, सचिन तेंडुलकर यांच्यानंतर लोकांना सौरभ गांगुलीचा बायोपिक पाहायला प्रेक्षकांना आवडेल यात काही शंका नाही. अजूनही निर्मात्याकडून याची अधिकृत घोषणा झालेली नाही.
Last Updated : Feb 28, 2020, 3:44 PM IST