महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'सुपर ३०' मधील फोटो शेअर करत हृतिकनं करून दिली विद्यार्थ्यांची ओळख - introduce

फोटोत हृतिकच्या समोर एक मुलगा बसला आहे. ज्याची हृतिक प्रेक्षकांना ओळख करून देत आहे. हा आहे बाँके, खिशात नेहमी वॉलेट ठेवतो, ते ही रिकामं...मी यामागचं कारण विचारलं तर म्हणतो सवय करून घेतोय, असं हृतिकनं म्हटलं आहे.

हृतिकनं करून दिली विद्यार्थ्यांची ओळख

By

Published : Jun 9, 2019, 11:30 PM IST

मुंबई- अभिनेता हृतिक रोशन लवकरच 'सुपर ३०' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित असणार असून त्यांच्या मार्गदर्शखाली शिकलेल्या ३० विद्यार्थ्यांची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

काही दिवसांपासूनच चित्रपटातील नवनवीन फोटो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता हृतिकने चित्रपटातील आपल्या विद्यार्थ्यांसोबतचा आणखी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत हृतिकनं या विद्यार्थ्यांची ओळखही करून दिली आहे.

फोटोत हृतिकच्या समोर एक मुलगा बसला आहे. ज्याची हृतिक प्रेक्षकांना ओळख करून देत आहे. हा आहे बाँके, खिशात नेहमी वॉलेट ठेवतो, ते ही रिकामं...मी यामागचं कारण विचारलं तर म्हणतो सवय करून घेतोय, असं हृतिकनं म्हटलं आहे. तर माझ्या मागे बसलेल्या मुलाचं नाव फुग्गा आहे. याने क्लासमध्ये प्रवेश घेण्यासाठी आपल्या शेजारच्यांच्या कोंबड्या विकल्या...भेटा माझ्या सुपर ३० मुलांना, असं म्हणत हृतिकनं आपल्या सुपर ३० विद्यार्थ्यांची बिकट परिस्थिती आणि त्यातही त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल माहिती दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details