मुंबई - ह्रतिक रोशन आणि त्याची मुले नेहमीच सुट्टीसाठी फिरायला जात असतात. त्यांच्यासोबत त्याची एक्स वाईफ सुझानही बऱ्याचवेळा मुलांसोबत असते. मात्र यावेळी संपूर्ण फॅमिलीसह दोघेही फिरायला गेले आहेत. सुझानने इन्स्टाग्रमावर फॅमिली व्हॅकेशनचा हा फोटो पोस्ट केला आहे.
सुझानने पोस्ट केलेल्या या फोटोला नेटकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलाय. अनेक चांगल्या प्रतिक्रिया तिला मिळत आहेत. या फोटोत सुझान मॉडर्न फॅमिलीसोबत मस्ती करताना दिसत आहे.