महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ह्रतिक ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता - दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा 2020

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये अभिनेता ह्रतिक रोशनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

Hritik Roshan
ह्रतिक ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

By

Published : Feb 22, 2020, 11:30 AM IST

मुंबई - अलिकडेच मुंबईत दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२० पार पडला. यामध्ये ह्रतिक रोशन याची निवड सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारासाठी झाली. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'सुपर ३०' या चित्रपटातील भूमिकेबद्दल हा पुरस्कार त्याला मिळाला.

'सुपर ३०' हा चित्रपट गणिततज्ञ आनंद कुमार यांचा बायोपिक होता. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत होतकरु विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत यशाचे शिखर गाठण्यास मदत करणाऱ्या शिक्षकाची ही भूमिका ह्रतिकने साकारली होती.

'सुपर ३०' मधील ह्रतिकने साकारलेल्या आनंद कुमार या व्यक्तीरेखेचे सर्वच स्तरातून कौतुक झाले. स्वत: आनंद कुमारनेही त्याच्या भूमिकचे मनापासून कौतुक केले होते.

'सुपर ३०' या चित्रपटातील 'एक राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वो ही बनेगा जो हकदार होगा' या डायलॉगचीही खूप तारीफ झाली होती. २०१९ हे वर्ष ह्रतिक रोशनसाठी खास होते. 'सुपर ३०' आणि 'वॉर' या दोन्ही चित्रपटाला उत्तुंग यश मिळाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details