मुंबई- बॉलिवूडचे दोन जबरदस्त अॅक्शन कलाकार हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ लवकरच आपल्या अॅक्शनचा नवा थरार घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'वॉर' या सिनेमातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
...म्हणून होणार नाही हृतिक-टायगरच्या 'वॉर'चा ट्रेलर लॉन्च इव्हेंट - वाणी कपूर
या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सिनेमाचा ट्रेलर लॉन्च इव्हेंट न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेलर लॉन्च इव्हेंटचा कोणताही फायदा चित्रपटाला यश मिळण्यात मदत करत नसल्याचं या निर्मात्यांचं मत असल्यानं त्यांनी हा इव्हेंट रद्द केला आहे.
दरम्यान, या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सिनेमाचा ट्रेलर लॉन्च इव्हेंट न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेलर लॉन्च इव्हेंटचा कोणताही फायदा चित्रपटाला यश मिळण्यात मदत करत नसल्याचं या निर्मात्यांचं मत आहे. त्यामुळेच त्यांनी हा इव्हेंट रद्द केला आहे. सिद्धार्थ आनंद यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
चित्रपटात वाणी कपूर मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट १५ देश आणि जगभरातील वेगवेगळ्या १५ शहरात चित्रीत केला गेला आहे. वॉरमधील अॅक्शन सीन हॉलिवूडच्या चार अॅक्शन दिग्दर्शकांनी कॉरिओग्राफ केले आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च इव्हेंट आयोजित न करता आम्ही थेट ट्रेलर व्हिडिओच्या माध्यमातून प्रदर्शित करणार असल्याचं आनंद यांनी म्हटलं आहे. यासोबतच हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. सिनेमा २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.