मुंबई - हृतिक रोशनची मुख्य भूमिका असलेला 'सुपर ३०' चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. हा चित्रपट आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यानंतर आता हृतिकनं चित्रपटातील एक फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.
हृतिकनं शेअर केला 'सुपर ३०'मधील मन हेलावणारा फोटो - anand kumar
पापड विकण्याचा हा काळ आनंद कुमारांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा काळ आहे. कारण आज ते जे काही आहेत ते यामुळेच आहेत, असं कॅप्शन हृतिकनं या फोटोला दिलं आहे.
या फोटोमध्ये आनंद कुमार यांचे पात्र साकारत असलेला हृतिक पापड विकताना दिसत आहे. पापड विकण्याचा हा काळ आनंद कुमारांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा काळ आहे. कारण आज ते जे काही आहेत ते यामुळेच आहेत, असं कॅप्शन हृतिकनं या फोटोला दिलं आहे.
एका सामान्य व्यक्तीची कथा सांगणारा हा फोटो मन हेलावणारा आहे. आनंद कुमार यांचा हाच प्रवास प्रेक्षकांना या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. विकास बहलद्वारा दिग्दर्शित हा चित्रपट १२ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.