महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ह्रतिक रोशनचा वेलनेस कोच म्हणतो, "कंगना विनाशाच्या मार्गावर"

सेलिब्रिटी वेलनेस कोच अरफीन खान यांनी अभिनेत्री-निर्माती कंगना रणौतबद्दल काही धक्कादायक निरीक्षणे शेअर केली आहेत. कंगनाचा मुख्य शत्रू हृतिक रोशनसोबत काम केलेल्या खानने असे मत व्यक्त केले आहे की "ती स्वत: ची तोडफोड करण्याचा विनाशकारी मार्गावर आहे."

कंगना आणि ह्रतिक रोशन
कंगना आणि ह्रतिक रोशन

By

Published : Dec 11, 2021, 7:06 PM IST

मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री-निर्माती कंगना रणौत "स्वतःच्या तोडफोडीच्या विनाशकारी मार्गावर आहे," असे सेलिब्रिटी वेलनेस कोच अरफीन खान याचे मत आहे. तिला आयुष्यात गंभीर धडे शिकवणाऱ्या प्रशिक्षकाची गरज आहे, असेही तो पुढोे म्हणाला.

कंगनाचे मन कसे कार्य करते हे समजून घेण्यासाठी जवळजवळ एक वर्ष त्याचे विश्लेषण करत असल्याचे अरफीन खान म्हणाला. तिच्या निरीक्षणांवर आधारित, अरफीनने असा दावा केला आहे की राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगना स्वत:ची तोडफोड करण्याच्या विनाशकारी मार्गावर आहे आणि तिला काही गंभीर प्रशिक्षणाची आवश्यकता आहे.

ड्रग प्रकरणी एनसीबीने केलेल्या कारवाईच्या आघातातून शाहरुखचा मुलगा आर्यन खानला बाहेर पडण्यासाठी कथितपणे मदत करणारा अरफीन खान म्हणाला की, "कंगना एका मोठ्या वाईट अवस्थेत जाईल."

त्याला असे का वाटते याबद्दल अधिक तपशीलवार सांगताना, खान एका वेबलॉइडशी बोलताना म्हणाला की अभिनेत्री कंगना विध्वंसक अशा प्रकारे महत्त्व आणि लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहे, ज्याला ती योग्या असल्याचे समजते. अरफीनने असेही म्हटले आहे की जर वेळीच मार्गदर्शन केले नाही तर कंगनाची "खूप वाईट स्थिती होईल".

अरफीनच्या इन्स्टा वर्णनामध्ये दावा आहे की तो "बॉलिवुडचा नंबर एक प्रशिक्षक, TED स्पीकर, ट्रान्सफॉर्मेशन एक्सपर्ट आणि आंतरराष्ट्रीय स्पीकर आहे." रिपोर्ट्सनुसार, त्याने अभिनेता हृतिक रोशनसोबत काम करायला सुरुवात केल्यानंतर त्याच्या करिअरला वेग आला. 2014 मध्ये सुझैन खानपासून विभक्त होत असताना ह्रतिकने अरफीनशी संपर्क साधला होता.

हेही वाचा -Bigg Boss 15: महिला स्पर्धकांचा अनादर करणाऱ्यांची सलमान खानने घेतली शाळा

ABOUT THE AUTHOR

...view details