मुंबई- अभिनेता हृतिक रोशनचे आजोबा आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माता अन् दिग्दर्शक जे ओम प्रकाश यांचे निधन झाले आहे. बुधवारी वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वीच हृतिकनं आजोबांसोबतचे काही फोटो शेअर करत त्यांचं आपल्या आयुष्यातील स्थान सांगत ट्विटरवर भावनिक पोस्ट लिहिली होती.
दिग्दर्शक जे ओम प्रकाश यांचे निधन, आजोबांसाठी हृतिकची भावनिक पोस्ट - आए दिन बहा
जे. ओम प्रकाश हे अभिनेता हृतिक रोशनची आई पिंकी रोशन यांचे वडील आहेत. ओम प्रकाश यांनी आप की कसम, आई मिलन की बेला, आया सावन झुम के, आए दिन बहार के आणि आदमी खिलौना है यांसारख्या उत्तम चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
माझे आजोबा ज्यांना मी प्रेमाने डेडा म्हणतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनी मला धडे शिकवले. जे आज मी माझ्या मुलांना शिकवत आहे. माझ्यातील कमी स्वीकारणं आणि माझ्यातील भीती दूर करण्यास त्यांनीच शिकवलं, असं हृतिकनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
जे. ओम प्रकाश हे अभिनेता हृतिक रोशनची आई पिंकी रोशन यांचे वडील आहेत. ओम प्रकाश यांनी आप की कसम, आई मिलन की बेला, आया सावन झुम के, आए दिन बहार के आणि आदमी खिलौना है यांसारख्या उत्तम चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली.