महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

हृतिक रोशनने आर्यन खानसाठी लिहिली पोस्ट : देव कणखर व्यक्तींची परीक्षा घेत असतो - क्रिमिनल लॉयर वकील सतीश मानशिंदे

हृतिक रोशनने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसाठी एक पोस्ट लिहिली आहे. आर्यन खानला पाठिंबा देत त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर लिहिले, "माय डिअर आर्यन. जीवन एक विचित्र प्रवास आहे. हे यासाठी उत्तम आहे कारण काहीही निश्चित नाही. हे छान आहे कारण ते तुमच्यावर कठीण परिस्थिती आणते. परंतु देव खूप कृपाळू आहे. प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या लोकांसमोर देव नेहमीच कठीण परिस्थिती निर्माण करतो."

हृतिक रोशनने आर्यन खानसाठी लिहिली पोस्ट
हृतिक रोशनने आर्यन खानसाठी लिहिली पोस्ट

By

Published : Oct 7, 2021, 7:47 PM IST

मुंबई- अभिनेता हृतिक रोशनने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसाठी एक पोस्ट लिहिली आहे. आर्यन खानला पाठिंबा देत त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर लिहिले, "माय डिअर आर्यन. जीवन एक विचित्र प्रवास आहे. हे यासाठी उत्तम आहे कारण काहीही निश्चित नाही. हे छान आहे कारण ते तुमच्यावर कठीण परिस्थिती आणते. परंतु देव खूप कृपाळू आहे. प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या लोकांसमोर देव नेहमीच कठीण परिस्थिती निर्माण करतो."

हृतिकने पुढे लिहिलंय, "तुला माहित आहे की तुझी यासाठी निवड केली गेली आहे. या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीत तू स्वतःला सांभाळ. तू स्वतःला सांभालत असशील असे मला वाटते. अशा परिस्थिती तुम्हाला राग, गोंधळ, असहाय्य्यता वाटणं अत्यंत साहजिक आहे. आणि एखाद्या हिरोला यातून बाहेर पाडण्यासाठी यासर्व गोष्टींची आवश्यकता असतेच."

"मात्र तू सावध राहा कारण याच गोष्टी तुम्हाला जाळून राखसुद्धा करू शकतात. त्यामुळे स्वतःमध्ये करुणा, दयाळूपणा आणि प्रेम या गोष्टी ठेवून स्वतः ला जळण्याची परवानगी द्या. यश, अपयश, सुख, समाधान, चुका या सर्व गोष्टी समान आहेत. फक्त आपण ठरवायचं असतं की यातील कोणत्या गोष्टी आपण आपल्या जवळ ठेवायच्या आणि कोणत्या गोष्टी अनुभवातून दूर फेकून द्यायच्या. मात्र या सर्व गोष्टी शेवटी तुमच्याच आहेत. त्या सर्वांचे मालक व्हा. मी तुला लहानपनापासून ओळखतो. एक माणूस म्हणून मी तुला ओळखतो. तू जो काही अनुभव घेत आहेस त्याला आत्मसात कर. ती तुला मिळालेली एक भेट आहे." असेही हृतिकने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

अखेर हृतिकने आर्यनला सूचवलंय की, "माझ्यावर विश्वास ठेव. ज्यावेळी या संपूर्ण गोष्टीकडे पाहशील तेव्हा तुला असंख्य गोष्टी कळून येतील. जर तुम्ही या सैतानाच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलंय आणि स्वतःला विचलीत होऊ दिल नाही, तर तुम्ही शांत राहून त्याचे निरिक्षण करा. तुम्हाला यातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्की मिळेल. मात्र यासाठी आधी तुम्हाला शांत राहावं लागणार आहे. धैर्याने काम करावं लागणार आहे. तुझ्यासाठी माझे खूप प्रेम. 7 ऑक्टोबर, 2021."

अलीकडेच हृतिक रोशनची माजी पत्नी सुझान खाननेही शाहरुख खान आणि गौरी खानच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली होती. सुझानने लिहिले, "मला वाटते की हे आर्यन खानबद्दल नाही, कारण तो दुर्दैवाने चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होता. बॉलिवूडचे लोक 'डायन हंट' कसे आहेत याचे उदाहरण म्हणून ही परिस्थिती घेता येईल. ही घटना दुःखद आणि चुकीची आहे, कारण तो एक चांगला मुलगा आहे. मी शाहरुख आणि गौरीसोबत उभी आहे."

आर्यन खानचा खटला मुंबईचे सुप्रसिद्ध क्रिमिनल लॉयर वकील सतीश मानशिंदे लढत आहेत. त्यांनी यापूर्वी सलमान खान, रिया चक्रवर्ती आणि संजय दत्त यांचा खटला लढवला आहे. आर्यनने एनसीबीला चौकशीदरम्यान अनेक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

हेही वाचा - सुपरस्टार शाहरुख खान म्हणाला होता... आर्यन ‘बॅड बॉय’ झालेला मला नक्की आवडेल

ABOUT THE AUTHOR

...view details