मुंबई- बॉलिवूड अभिनेता किंवा अभिनेत्री बहुतेकदा आपल्या लोकप्रियतेमुळे गर्दीपासून दूर राहण्याचा आणि उच्च जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, अशात हृतिक रोशनने केलेल्या एका गोष्टीमुळे त्याचे चाहते त्याच्यावर चांगलेच खूश झाले आहेत.
खुर्ची नव्हे तर जमिनीवर बसून हृतिकनं केलं सुपर ३०चं प्रमोशन, चाहते फिदा - mathmatician
'सुपर ३०' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका ठिकाणी हजेरी लावली असता हृतिक खुर्चीवर न बसता जमिनीवर बसला. अनेकांनी त्याला खुर्चीवर बसण्याचा आग्रह केला, मात्र त्याने जमिनीवर बसणंच पसंत केलं.
![खुर्ची नव्हे तर जमिनीवर बसून हृतिकनं केलं सुपर ३०चं प्रमोशन, चाहते फिदा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3804051-thumbnail-3x2-hrithik.jpg)
हृतिक रोशन लवकरच सुपर ३० चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात गणिततज्ञ आनंद कुमार आणि त्यांचे सामान्य पण सुपर ३० विद्यार्थी यांचा प्रवास उलगडला जाणार आहे. दरम्यान या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका ठिकाणी हजेरी लावली असता हृतिक खुर्चीवर न बसता जमिनीवर बसला.
अनेकांनी त्याला खुर्चीवर बसण्याचा आग्रह केला, मात्र त्याने जमिनीवर बसणंच पसंत केलं. हृतिकचा हा व्हिडिओ काही तासातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओला हृतिकच्या चाहत्यांची चांगलीच पसंती तर मिळालीच. मात्र चाहत्यांनी त्याचं कौतुक करत हृतिक अतिशय नम्र व्यक्ती असल्याचं म्हटलं.