मुंबई- अभिनेता हृतिक रोशन लवकरच सुपर ३० चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो एका गणिताच्या शिक्षकाची भूमिका साकारणार आहे. याच निमित्ताने एक पोस्ट शेअर करत हृतकिने सर्व शिक्षकांचे समाजाला आकार देण्यासाठी आभार मानले आहेत.
हृतिकनं मानले शिक्षकांचे आभार, शेअर केली खास पोस्ट
लोक शिकतात आणि देश पुढे जातो. जर तुम्हाला तुमच्या देशाला पुढे घेऊन जायचे असेल तर शिक्षक व्हा, असे हृतिकने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
एखादा बदल कधी घडतो, त्याची सुरुवात एखाद्या विचारापासून होते. नंतर हेच विचार आपण दुसऱ्यांमध्येही पेरतो. यातूनच लोक शिकतात आणि देश पुढे जातो. जर तुम्हाला तुमच्या देशाला पुढे घेऊन जायचे असेल तर शिक्षक व्हा. कारण, हे तेच असतात जे समाजात चांगले विचार पेरतात आणि समाजाला आणि देशाला खऱ्या अर्थाने आकार देतात.
मी अनेक लोकांकडून असं ऐकलं की, मला समाजात काहीतरी बदल घडवायचा आहे. मात्र, मला एक शिक्षक बनून जगामध्ये बदल घडवायचा आहे, असं कधीच ऐकलं नाही. असे म्हणत सर्व शिक्षकांचं त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले आहेत. दरम्यान, विकी बहलचं दिग्दर्शन असणारा सुपर ३० चित्रपट १२ जुलैला प्रदर्शित होणार आहे.