महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

प्रियंका चोप्रा जोनास साठी ह्रितिक रोशन आहे वास्तविक जीवनातीलही सुपरहीरो! - प्रियंकाची बायोग्राफी अनफिनिश्ड

प्रियंका चोप्राला ह्रितिक रोशन खऱ्या आयुष्यातही सुपरहिरो वाटतो. तिने हे तिच्या बायोग्राफी पुस्तक ‘अनफिनिश्ड’ मध्ये सुद्धा लिहिलंय. त्याच्या माणुसकीचा व उदारतेच किस्सा तिने विस्तुतपणे मांडला आहे. तिच्या वडिलांची तब्येत बिघडली असताना त्याने न मागताही उस्फूतपणे केलेली मदत तिच्या आयुष्यभर आठवणीत राहणारी असेल असे ती सांगते.

Priyanka Chopra Jonas
प्रियंका चोप्रा जोनास

By

Published : Feb 15, 2021, 12:31 PM IST

प्रियंका चोप्रा हिने ह्रितिक रोशन सोबत क्रिश (२००६), अग्निपथ (२०१२) आणि क्रिश ३ (२०१३) मध्ये काम केले होते. मोठ्या पडद्यावर त्या दोघांची जोडी शोभून दिसली होती. ह्रितिक उत्तम अभिनेता तर आहेच परंतु त्याहीपेक्षा तो ग्रेट माणूस आहे, असे प्रियांका ठासून सांगते. तिने हे तिच्या बायोग्राफी पुस्तक ‘अनफिनिश्ड’ मध्ये सुद्धा लिहिलंय. त्याच्या माणुसकीचा व उदारतेच किस्सा तिने विस्तुतपणे मांडला आहे. तिच्या वडिलांची तब्येत बिघडली असताना त्याने न मागताही उस्फूतपणे केलेली मदत तिच्या आयुष्यभर आठवणीत राहणारी असेल असे ती सांगते.

प्रियंकाची बायोग्राफी अनफिनिश्ड
प्रियांकाच्या सुरुवातीच्या दिवसात ती ह्रितिक बरोबर ‘क्रिश’ हा चित्रपट करीत होती. तोपर्यंतचा तिचा तो सर्वात मोठा चित्रपट. त्याच सुमारास अचानक तिच्या वडिलांची, डॉ अशोक चोप्रा यांची, तब्येत ढासळली. अतिशय गुंतागुंतीची वैद्यकीय परिस्थिती निर्माण झाली होती. शूटिंग आणि हॉस्पिटलच्या फेऱ्या सुरु होत्या. त्याचसुमारास तिच्या वडिलांना विदेशात नेण्याचे ठरले असे तिला कळले. तिला कल्पनाच नव्हती की ही काय चाललंय. देशातील वैद्यकीय सेवा महाग वाटत असताना थेट विदेशातील उपचार कसे परवडणार या चिंतेत असताना तिला कळले की दोन देवदूत (तिच्यासाठी तरीही) तिच्या वडिलांच्या उपचारांची काळजी घेताहेत. ते दोन देवदूत म्हणजे राकेश रोशन आणि ह्रितिक रोशन.
ह्रितिक रोशन
जेव्हा ह्रितिकला प्रियांकाच्या वडिलांच्या आजाराबद्दल कळले तेव्हा त्यांना परदेशात चांगली ट्रीटमेंट मिळेल असे कळले आणि त्याने कसलीही कसर सोडली नाही. त्याने त्याचे ‘काँटॅक्ट्स’ वापरत एअर इंडियामध्ये त्यांना लंडनला घेऊन जाण्यासाठी खास सोय केली. ह्रितिकच्या वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे डॉ. चोप्रा यांना लंडन येथे हलविण्यात आले आणि आवश्यक उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात आल्या आणि ते बरेही झाले. हृतिकबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार्‍या प्रियांकाने लिहिले आहे की, “बोस्टनमधील आमचे नातेवाईक आणि ह्रितिक व त्याचे वडील राकेश सर, यांची वेळीच मदत मिळाली नसती तर मला शंका आहे की माझे वडील वाचले असते. मी त्यांच्याबद्दल कितीही कृतज्ञता व्यक्त केली तरी ते कमी आहे.” प्रियंकाप्रमाणेच इतरही अनेक को-स्टार, क्रू मेंबर्स आणि त्यांचे कुटुंबीय ह्रितिकच्या दयाळू कृत्याबद्दल कृतज्ञ आहेत. ह्रितिक रोशन कदाचित एकमेव भारतीय सुपरस्टार आहे ज्याच्या नावावर असे अनेक यशस्वी सुपरहीरो चित्रपट आहेत आणि तो त्याच्या चित्रपटांप्रमाणेच वास्तविक जीवनातही एक सुपरहीरो आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details