मुंबई - अभिनेता हृतिक रोशननं आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. तर त्याच्या काही चित्रपटांना अपयशही आलं. मात्र, या अपयशानं खचून न जाता यातूनच हृतिकनं प्रेरणा घेतली. आज आपल्या यशात याच फ्लॉप चित्रपटांचा मोठा वाटा असल्याचं हृतिकनं म्हटलं आहे.
आपल्या यशाचं श्रेय या गोष्टीला देतो हृतिक, म्हणाला यामुळेच आयुष्यात उंची गाठू शकलो - कोई मिल गया
कहो ना प्यार हैं, या सुपरहिट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱया हृतिकच्या यादे, ना तुम जानो ना हम, लक्ष्य, काईट्स आणि मोहेंजो दारोसारख्या काही सिनेमांना अपयश आलं.नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत हृतिक म्हटला, की या अपयश आलेल्या चित्रपटांमुळेच मला आयुष्यात उंची गाठणं शक्य झालं.
कहो ना प्यार हैं, या सुपरहिट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱया हृतिकचे फिजा, कभी खुशी कभी गम, कोई मिल गया, क्रिश आणि जिंदगी ना मिलेगी दोबारासारखे अनेक चित्रपट हिट ठरले. तर त्याच्या यादे, ना तुम जानो ना हम, लक्ष्य, काईट्स आणि मोहेंजो दारोसारख्या काही सिनेमांना अपयश आलं.
नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत हृतिक म्हटला, की या अपयश आलेल्या चित्रपटांमुळेच मला आयुष्यात उंची गाठणं शक्य झालं. आज जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा हा मोठा प्रवास असल्यासारखं वाटतं. यश आणि अपयशानं आयुष्यात अनेक धडे शिकवले. मी आज जे काही आहे, ते आजपर्यंत आलेल्या अपयशामुळेच, कारण यांनीच मला चांगल्या गोष्टीची निवड करणं शिकवलं, असं तो म्हणाला.