मुंबई- बॉलिवूडचा सुपरहिरो ह्रतिक रोशन पुन्हा एकदा निळ्या डोळ्यांच्या परग्रहावरुन आलेल्या जादूसोबत झळकणार आहे. 'क्रिश ४' या चित्रपटात ह्रतिक आणि जादूची जोडी पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. क्रिशच्या यशस्वी फ्रांचाईसपैकी एक असलेला हा आगामी चित्रपट भरपूर नाट्यमय आणि मनोरंजक असेल.
या चित्रपटाच्या दिग्दर्शकाशी संबंधित व्यक्तीने सांगितले, ''क्रिशची कथा पुढे कशी घेऊन जायची याबाबत राकेशजी, ह्रतिक यांनी लेखकांच्या टीमसोबत चर्चा केली आणि अखेर त्यांनी एका गोष्टीवर एकमत करीत पक्के केले. लोकांच्या स्मरणात असेला जादू परत आला तर तो प्रेक्षकांना आवडणारा आहे. 'क्रिश ३' मध्ये रोहित मेहरा मरण पावला. आता क्रिशला स्पेशल पॉवर देणाऱ्या एलियनची ओळख होणे आवश्यक आहे.''
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ह्रतिक रोशन आणि राकेश रोशन या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर भरपूर मेहनत घेत आहेत. याचे शूटिंग लवकरात लवकर सुरू करण्यासाठी ते उत्सुक आहेत. त्यांनी चित्रपटाची भव्यता, तांत्रिक बाबी, दृष्ये यासाठी तज्ञांशी बोलायला सुरुवात केली आहे.