मुंबई - 'ग्रीक गॉड' या नावाने प्रसिद्ध असलेला बॉलिवूडचा पहिला सुपरहिरो हृतिक रोशनचा सोमवारी (10 जानेवारी) 48 वा वाढदिवस आहे. हृतिक रोशन हा चित्रपटसृष्टीतील सर्वात मेहनती व सुंदर अभिनेत्यांपैकी एक आहे. हृतिकच्या सेक्सी लूकसमोर बॉलिवूड आणि हॉलिवूडचे कलाकार टिकत नाहीत. हृतिककडे दमदार अभिनय आणि उत्कृष्ट नृत्य कौशल्य आहे. एक काळ असा होता की हृतिकला एका आजाराने घेरले होते आणि त्याच्या आजारासमोर डॉक्टरांनीही हात टेकले होते. हृतिकच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्याशी संबंधित काही खास आणि मनोरंजक गोष्टी जाणून घेणार आहोत.
हृतिक रोशनचा पदार्पणात धमाका
हृतिक रोशनने 'कहो ना प्यार है' (2000) या चित्रपटाद्वारे अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण केले. हृतिकचा हा 'कहो ना प्यार है' पहिला चित्रपट 21व्या शतकाच्या सुरुवातीला मेगाब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. हृतिक रोशन त्याच्या पहिल्याच चित्रपटापासून जगभर प्रसिद्ध झाला. या चित्रपटात हृतिकने आपल्या दुसऱ्या भूमिकेत डान्स आणि स्टाइलने जे काही निर्माण केले त्याला चाहते आजही विसरलेले नाहीत.
बालकलाकार हृतिक रोशन
हृतिक रोशनबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे की तो बालकलाकार देखील होता. हृतिक हा चित्रपट पार्श्वभूमी असलेला आहे, त्यामुळे त्याने लहानपणापासूनच आपल्या अभिनयात सुधारणा करण्यास सुरुवात केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हृतिक रोशनचे आजोबा ओम प्रकाश रोशन यांनी त्याला 'आशा' चित्रपटात बालकलाकार म्हणून त्याला संधी दिली होती. या चित्रपटासाठी हृतिकला १०० रुपये फी मिळाली होती.
सेटवर झाडू मारण्यापासून चहा बनवण्याची कामेही करायचा ह्रतिक
हृतिक रोशनला नृत्याचे कौशल्य लहानपणापासूनच अवगत होते. त्याने सुरुवातीपासूनच अभिनेता होण्याचे स्वप्न पाहिले होते. तो वडिलांकडे सहाय्यक म्हणून काम करत असे. दरम्यान, हृतिकने अनेकदा सेटवर झाडूही लावला आहे आणि चहा बनवण्यासारखे कामही केले आहे.
ह्रतिकला आले होते लग्नाचे ३० हजार प्रस्ताव