मुंबई- अॅक्शन स्टार टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशन ही जोडी लवकरच एकत्र झळकणार आहे. आगामी 'वॉर' या सिनेमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहात असलेल्या या सिनेमाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं आहे.
हेही वाचा - शुभ मंगल सावधानला दोन वर्ष पूर्ण, भूमीने शेअर केली भावनिक पोस्ट
यश राज फिल्मसच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करत याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये हृतिक आणि टायगर चित्रपटाच्या इतर टीम मेंबर्ससोबत पोज देताना दिसत आहे. हा एक ब्लॅक अॅण्ड व्हाईड व्हिडिओ आहे.
या सिनेमात टायगर आणि हृतिकशिवाय अभिनत्री वाणी कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ७ देशांमध्ये चित्रीत झालेला हा सिनेमा येत्या २ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थ आनंद यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर आदित्य चोप्राची निर्मिती आहे.
हेही वाचा - सेंसर बोर्डाला मिळाला नवा लोगो