मुंबई - बॉलिवूडमधील दोन लोकप्रिय स्टार हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण पहिल्यांदाच 'फाइटर' चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असून चित्रपटाच्या स्टार कास्टनेही यासाठी तयारी दर्शविली आहे. हृतिक रोशनने यासंदर्भात फोटो शेअर केले आहेत, त्यामध्ये तो दीपिका पादुकोण आणि 'फाइटर' चित्रपटाच्या टीमसोबत दिसत आहे.
या फोटोमध्ये हृतिक रोशन ब्लॅक टी-शर्ट आणि कॅपमध्ये दजिसत असून दीपिका लाल रंगाच्या ड्रेसमध्ये मोकळ्या केसांसह खूपच सुंदर दिसत आहे. हृतिकने फोटोला कॅप्शन दिलंय, ''ही गँग टेक ऑफ करण्यासाठी सज्ज आहे.'' आतापर्यंत या फोटोला १७ लाखाहून अधिक लोकांनी लाईक केलंय. यामध्ये आलिया भट्टसह अनेक सेलेब्रिटींचा समावेश आहे.