मुंबई- हृतिक रोशन लवकरच 'सुपर ३०' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असताना हृतिक अनेकदा चित्रपटाशी निगडीत खास व्हिडिओ आणि फोटो आपल्या सोशल मीडियावरून शेअर करताना दिसतो. अशात आता हृतिकनं आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे.
हृतिकनं सांगितला 'सुपर ३०'मधील विद्यार्थ्यांसोबतचा अनुभव, व्हिडिओ केला शेअर - share post
'सुपर ३०' चा पहिला क्लास माझ्यासाठी भरपूर शिकण्यासारखा होता, तर त्यांच्यातील उत्साह हा माझ्यासाठी धडा होता, असे हृतिकने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
![हृतिकनं सांगितला 'सुपर ३०'मधील विद्यार्थ्यांसोबतचा अनुभव, व्हिडिओ केला शेअर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3774157-thumbnail-3x2-hrithik.jpg)
हा चित्रपट गणिततज्ञ आनंद कुमार आणि त्यांच्या ३० विद्यार्थ्यांवर आधारित असणार आहे. हृतिक रोशन चित्रपटात आनंद कुमार यांची भूमिका साकारणार आहे. तर या ३० विद्यार्थ्यांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांसोबतच्या पहिल्या भेटीचा अनुभव सांगत हृतिकनं हा व्हिडिओ शेअर केला आहे.
या कलाकारांचं कौतुक करत, जेव्हा मी त्या खोलीमध्ये प्रवेश केला तेव्हा असा विचारही केला नव्हता, की मी अशा मुलांसमोर उभा आहे ज्यांचा उत्साह माझं काम अधिक सोप करेल आणि आयुष्यभर माझ्यासोबत राहिल. 'सुपर ३०' चा पहिला क्लास माझ्यासाठी भरपूर शिकण्यासारखा होता, तर त्यांच्यातील उत्साह हा माझ्यासाठी धडा होता, असे हृतिकने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान विकास बहलचं दिग्दर्शन असलेला 'सुपर ३०' चित्रपट १२ जुलैला प्रदर्शित होणार आहे.