देशात पहिल्यांदाच भारतीय रेल्वेने एक नवा आकर्षक बदल केला आहे. 'प्रमोशन ऑन व्हील्स' या संकल्पनेला सुरुवात झाली असून या अंतर्गत आगामी "हाऊसफुल ४" या चित्रपटाची टीम मुंबईहून दिल्लीला रवाना झाली. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर करण्याची नवी पध्दत यामुळे सुरू झाली आहे.
इतिहासात पहिल्यांदाच "हाऊसफुल ४" चे 'प्रमोशन ऑन व्हील्स' रेल्वेतून
'प्रमोशन ऑन व्हील्स' या संकल्पनेला सुरूवात झाली असून या अंतर्गत आगामी "हाऊसफुल ४" या चित्रपटाची टीम मुंबईहून दिल्लीला रवाना झाली. मुंबई ते दिल्ली या दरम्यान वेगवेगळ्या स्टेशन्सवर "हाऊसफुल ४" चे कलाकार चाहत्यांना भेटतील, संवाद साधतील आणि प्रमोशनही करतील.
फिल्म इंडस्ट्रीमध्ये या रेल्वेच्या सुविधामुळे एक नवा पायंडा पडणार आहे. रेल्वेचे देशभर नेटवर्क आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी याचा उत्तम वापर होऊ शकतो. मुंबई ते दिल्ली या दरम्यान वेगवेगळ्या स्टेशन्सवर "हाऊसफुल ४" चे कलाकार चाहत्यांना भेटतील, संवाद साधतील आणि प्रमोशनही करतील. मुंबईतून ट्रेन सुटताना या ऐतिहासिक क्षणाची दृष्ये चित्रीत करण्यासाठी मीडियासह मोठ्या संख्येने लोक हजर होते.
अक्षय कुमार, बॉबी देओल, रितेश देशमुख, कृति खरबंदा, कृति सेनन आणि पूजा हेगडे यांच्या प्रमुख भूमिका असेलेल्या "हाऊसफुल ४" चित्रपटात भरपूर मनोरंजन पाहायला मिळेल. ‘हाऊसफुल ४’ हा ‘हाऊसफुल’ या फ्रँचाइजीमधला चौथा चित्रपट आहे. फरहाद समजी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर, साजिद नादियाडवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. २५ ऑक्टोंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राणा दुगबत्ती, चंकी पांडे, सौरभ शुक्ला, जॉनी लिवर, जेमी लिवर आणि इतरही कलाकार यामध्ये झळकणार आहेत.