मुंबई: 'हाउसफुल 4' ची टीम प्रमोशनल ट्रेनमधून दिल्लीला रवाना झाली आहे. प्रमोशन ऑन व्हिल्स अंतर्गत त्यांनी हे पाऊल उचलले आहे. अक्षय कुमार, कृति सेनन, रितेश देशमुख, कृति खरबंदा, पूजा हेगड़े, बॉबी देओल आणि चंकी पांडे यांनी ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
'हाउसफुल 4 एक्सप्रेस'मधून प्रवास करतानाचा अक्षय, रितेशचा धमाल व्हिडिओ - Akshay Kumar latest news
'हाउसफुल ४ ' ची टीम मुंबईहून दिल्लीला ट्रेनमधून प्रवास करणार आहे. अक्षय कुमार, कृति सेनन, रितेश देशमुख, कृति खरबंदा, पूजा हेगड़े, बॉबी देओल आणि चंकी पांडे यांनी ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
'हाउसफुल 4' च्या कालाकारंनी प्रवासातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, "टीम # हाउसफुल 4 नवी दिल्लीसाठी मुंबईहून ट्रेनमध्ये चढण्यास सज्ज. वेडेपणाचा भाग बना. आमच्या अपडेटसाठी # हाउसफुल 4 एक्सप्रेसला फॉलो करा."
सर्व कलाकारांनी प्रमोशनल ट्रेनमधून दिल्लीला जाण्यासाठीची आपली उत्सुकता शेअर केली आहे. आज ही ट्रेन मुंबई सेंट्रलवरुन सुटून गुरुवारी नवी दिल्लीत पोहोचेल. भारतीय रेल्वेने प्रमोशन ऑन व्हिल या नावाने सेवा सुरू केली आहे. या अंतर्गत चित्रपटाचे प्रमोशन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अशा प्रकारचे प्रमोशन करणारा 'हाउसफुल 4' हा पहिलाच चित्रपट असेल. २५ ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.