मुंबई- ‘स्त्री’ चित्रपटाला मिळालेल्या व्यावसायिक यशानंतर, बॉलीवूड चित्रपट निर्मात्यांनी अचानक हॉरर-कॉमेडीच्या शैलीमध्ये रस घेण्यास सुरुवात केलीय. याच ‘जॉनर’ मधील ‘भूत पोलीस’ चित्रपट असून तो प्रेक्षकांना घाबरवत हसवणारा असणार आहे.
धडकीबाज चित्रपट ‘भूत पोलीस’ चे चित्रीकरण नुकतेच आटोपले असून हा चित्रपट आता पोस्ट प्रॉडक्शनला जाईल. ‘इट्स अ रॅप’ म्हणत या चित्रपटातील यामी गौतमने आपल्या समाज माध्यमावर सूचित केले. या चित्रपटात सैफ अली खान, अर्जुन कपूर, जॅकलिन फेर्नांडीझ आणि यामी गौतम प्रमुख भूमिकांत असून जावेद जाफरी देखील महत्वपूर्ण भूमिकेतून दिसेल.
लॉकडाऊन शिथिल झाल्यावर ‘भूत पोलीस’ च्या टीमने डलहौसी आणि धरमशाला या निसर्गरम्य ठिकाणी बहुतांश चित्रीकरण केले व त्यांनी शेवटचे शेड्युल जैसलमेर येथे शूट केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन पवन किर्पालानी असून निर्मिती रमेश तौरानी आणि अक्षय पुरी यांनी केली असून जया तौरानी सहनिर्माती आहे. ‘भूत पोलीस’ टिप्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि 12th स्ट्रीट एंटरटेन्मेन्ट च्या बॅनर खाली बनत आहे.