मुंबई -सुख आणि आनंदाची अपेक्षा बाळगत अभिनेता विकी कौशलने आपला एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात तो आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये बसलेला दिसत आहे.
चक्रीवादळ कोसळण्याची शक्यता असल्याने त्यांनी चाहत्यांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले. 100 किमी प्रतितास वेगाने मुंबईच्या आसपास वाऱ्याचा वेग राहणार असून अलिबागमध्ये दरड कोसळण्याची शक्यता आहे. 32 वर्षीय अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर पाऊस पडण्यापूर्वी ढगांचे एक सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो खुर्चीवर बसलेला दिसतो, त्याचबरोबर तो काही खोल विचारात बुडलेला दिसतो. फोटोच्या कॅप्शनमध्ये विक्कीने लिहिले, "आशा आहे की हा पाऊस आनंद आणेल, नाट्य नाही. प्रत्येकाने सुरक्षित रहावे." "
हेही वाचा - Live Update 'निसर्ग': थोड्याच वेळात अलिबाग किनारपट्टीवर धडकणार निसर्ग 'चक्रीवादळ'