मुंबई- सध्या कोरोनाची साथ सुरू असल्यामुळे बॉलिवूड सेलेब्रिटींनी होळीचा उत्सव साजरा करताना संयम पाळला आहे. उत्सवाच्या शुभेच्छा देत करिना कपूर आणि अक्षय कुमार यांनी रंगबिरंगी फोटो शेअर केले आहेत.
सोमवारी करिनाने इन्स्टाग्रामवर तैमुरसोबतचा फोटो शेअर केला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'सुरक्षित राहा', असे सांगत होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आदल्या दिवशी करीनाने तिच्या एका गाण्याचा एक व्हिडिओही शेअर केला होता ज्यामध्ये अक्षय कुमारसोबत होळी साजरी करताना ती दिसली होती.