महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'सूरज पे मंगल भारी' सिनेमा रचणार इतिहास - दिलजीत दोसंज - लॉक डाऊननंतर थिएटरमध्ये येणारा पहिला सिनेमा

लॉकडाऊननंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा पहिला सिनेमा 'सूरज पे मंगल भारी" ठरणार असल्यामुळे हा एक इतिहास असल्याचे दिलजीत दोसंजने म्हटले आहे. प्रेक्षकांनी प्रतिसाद दिल्यास तोही पुन्हा एक इतिहास असेल असेही तो म्हणाला.

Diljit Dosanj
दिलजीत दोसंज

By

Published : Nov 13, 2020, 5:01 PM IST

मुंबई- अभिनेता-गायक दिलजीत दोसंज याचा 'सूरज पे मंगल भारी" हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. १५ नोव्हेंबरला हा सिनेमा थिएटरमध्ये झळकेल. अंग्रेजी मीडियम हा चित्रपट १३ मार्च रोजी चित्रपटगृहात रिलीज झालेला शेवटचा होता. त्यामुळे लॉकडाऊननंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा पहिला सिनेमा 'सूरज पे मंगल भारी" ठरणार असल्यामुळे हा एक इतिहास असल्याचे दिलजीतने म्हटले आहे.

दिलजित म्हणाला, "जेव्हा सूरज पे मंगल हा पहिला लॉकडाऊननंतर थिएटरमध्ये येणारा पहिला सिनेमा असेल. तेव्हा मी स्वत: ला भाग्यवान समजतो. मला वाटते की आमच्या चित्रपटाने या अर्थाने इतिहास घडविला आहे आणि प्रेक्षक आपला चित्रपट पहायला आले तर हा पुन्हा इतिहास होईल. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, म्हणून मी आशा करतो की या उत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने लोक येतील. "

हेही वाचा - कुशाग्र अभिनेता म्हणून 'जब वी मेट'मध्ये आसिफ यांना कास्ट केले - इम्तियाज अली

'सूरज पे मंगल भारी' यापूर्वी १३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता. पण निर्माता झी स्टुडिओने याच्या रिलीजची नवी तारीख जाहीर केली आहे.

मनोज बाजपेयी, दिलजीत दोसंज आणि फातिमा सना शेख अभिनीत या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला होता. त्यात नॉन स्टॉप कॉमेडीची चौफेर उधळण दिसली होती. हा चित्रपट लग्नाच्या निमित्ताने झालेल्या हेरगिरीचा आहे.

हेही वाचा - वरुण धवनने शेअर केला अंडर वॉटर व्हिडीओ

'सूरज पे मंगल भारी' हा चित्रपट भूतकाळातील साधेपणाचा विचार लक्षात ठेवून करण्यात आलाय. याच्या कथेत एक साधेपणा आहे. हा साधेपणा आपल्याला हृषिकेश मुखर्जी आणि बासू चटर्जी यांच्या चित्रपटांची आठवण करुन देणारा आहे. हा एक सुरेख कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details