मुंबई- १९९४ मध्ये आलेल्या 'द लायन किंग' चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. आता हाच चित्रपट नव्या रुपात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘द लायन किंग’च्या हिंदी चित्रपटातील भूमिकांना अनेक बॉलिवूड कलाकारांनी आवाज दिले आहेत. यामध्येच बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचाही समावेश आहे.
डिझनीच्या किंगला बॉलिवूडच्या किंग खानचा आवाज, पाहा 'लायन किंग'चा हिंदी ट्रेलर - mufasa
शाहरूखच्या आवाजातील या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटात शाहरूखने मुफासा या पात्राला आवाज दिला आहे.
आता शाहरूखच्या आवाजातील या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटात शाहरूखने मुफासा या पात्राला आवाज दिला आहे. या व्हिडिओमधील त्याच्या आवाजाच्या चाहतेही नक्कीच प्रेमात पडतील. शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये शाहरूखच्या दमदार आवाजाची जादू अनुभवायला मिळते.
विशेष म्हणजे या चित्रपटातील सिंबा या मुख्य पात्राला शाहरूखचा मुलगा आर्यन खान याने आवाज दिला आहे. चाहत्यांनाही आता या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनची उत्सुकता आहे. हा चित्रपट १९ जुलै २०१९ ला प्रदर्शित होणार आहे. इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.