महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'फास्ट अँड फ्यूरिअस'चा हिंदी ट्रेलर प्रदर्शित - Hobbs And Shaw

प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत असतानाचा आता याचा हिंदीमधील ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये जबरदस्त अॅक्शन सीनसोबतच बाईक आणि कार स्टंटही पाहायला मिळत आहेत. चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणारा हा ट्रेलर आहे.

'फास्ट अँड फ्यूरिअस'चा हिंदी ट्रेलर प्रदर्शित

By

Published : Jul 24, 2019, 9:00 PM IST

मुंबई- जगभरात सुमारे ५ बिलीयन डॉलर कमवणाऱ्या हॉलिवूड चित्रपट फास्ट अँड फ्युरिअसच्या ८ भागानंतर फ्यूरिअस फ्रँचाईजचा नवा चित्रपट 'फास्ट अँड फ्यूरिअस - हॉब्ज अँड शॉ' २ ऑगस्टला प्रदर्शित होतोय. हा चित्रपट भारतात हिंदीसह इंग्लिश, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे.

प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत असतानाचा आता याचा हिंदीमधील ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये जबरदस्त अॅक्शन सीनसोबतच बाईक आणि कार स्टंटही पाहायला मिळत आहेत. चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणारा हा ट्रेलर आहे.

या चित्रपटात ड्वेन जॉन्सन आणि जेसन स्टॅथम ल्यूक हॉब्स आणि रॉक्स शॉ या भूमिकेत पुन्हा दिसणार आहेत. यात ड्वेन जॉन्सन अमेरिकेच्या प्रामाणिक सुरक्षा अधिकाऱ्याची भूमिका साकारत असून स्टॅथम अपराध्याच्या भूमिकेत आहे. फास्ट अँड फ्यूरिअस चित्रपटाचे जे चाहते आहेत त्यांच्यासाठी हा नवा भाग पर्वणी ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details