मुंबई- आर्मी ऑफिसर बिष्णू श्रेष्ठांवर आधारित बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबद्दलची अधिकृत घोषणा झाली असून हिमेश रेशमियाने या बायोपिकचे हक्क विकत घेतले आहेत. चित्रपटात मुख्य अभिनेत्याची भूमिका कोण साकारणार हे मात्र अद्याप ठरलेलं नाही.
आर्मी ऑफिसर बिष्णू श्रेष्ठांवर येणार बायोपिक, हिमेश रेशमियाने विकत घेतले हक्क
बिष्णू श्रेष्ठा असे आर्मी ऑफिसर होते ज्यांनी ४० चोरांसोबत एकट्याने लढा दिला होता. २०१० मध्ये ४० चोरांनी मौर्या एक्सप्रेस ही रेल्वेगाडी थांबवत प्रवाशांचे सामान चोरण्याचा प्रयत्न केला होता.
बिष्णू श्रेष्ठा असे आर्मी ऑफिसर होते ज्यांनी ४० चोरांसोबत एकट्याने लढा दिला होता. २०१० मध्ये ४० चोरांनी मौर्या एक्सप्रेस ही रेल्वेगाडी थांबवत प्रवाशांचे सामान चोरण्याचा प्रयत्न केला होता. या चोरांकडे भरपूर हत्यारेही होती. मात्र, अशा परिस्थितीत बिष्णू यांनी एकट्याने या चोरांसोबत दोन हात करत यातील तीन चोरांना मारलं होतं. ज्यानंतर इतर चोर जखमी होऊन तेथून फरार झाले होते.
त्यांच्या याच धाडसाची कथा या बायोपिकमध्ये दाखवण्यात येणार आहे. याशिवाय हिमेशच्या इतर चार चित्रपटांविषयीदेखील घोषणा करण्यात आली आहे. यात द एक्सपोज चित्रपटाच्या सिक्वलचाही समावेश आहे. द एक्सपोज रिटर्न असं या चित्रपटाचं शीर्षक असणार आहे.