मुंबई - कोरोना दरम्यान चित्रपट आणि टीव्ही शोचे शूटिंग पुन्हा सुरू झाले आहे. कोरोनाच्या या काळात एखादा रोमँटिक सीन असेल तर त्याचे शूट कसे केले जाईल, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. अभिनेता अपारशक्ति खुरानाने आपल्या आगामी चित्रपटातील एक दृश्य शेअर केले असून कोरोना काळात रोमॅन्टिक दृश्य कसे शूट केले जाईल, हे सांगितले आहे.
अपारशक्ति खुरानाचा 'हेल्मेट' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रनुतन बहल मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाच्या एका सीनचा फोटो अपारशक्ति शेअर केला आहे. अपारशक्तीने शेअर केलेल्या एका फोटोत तो आणि प्रनुतन रोमान्स करताना पाहायला मिळत आहेत. दुसरा फोटो अपारशक्तीने एडीट केला असून दोघांनाही फेस शील्ड घातले आहे.