महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Hijab Row: हिजाबच्या वादात सोनम कपूर झाली ट्रोल - सोनम कपूर झाली ट्रोल

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरला सध्या सुरू असलेल्या हिजाबच्या वादात उतरल्यानंतर ट्विटरवरच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. हिजाब वादावरील तिच्या मुद्द्यावर तिला प्रतिक्रियेचा सामना करावा लागत असताना सोनमलाही काही लोकांमध्ये पाठिंबाही मिळाला आहे.

हिजाबच्या वादात सोनम कपूर
हिजाबच्या वादात सोनम कपूर

By

Published : Feb 12, 2022, 3:11 PM IST

मुंबई- विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी द्यायची की नाही यावरून कर्नाटक राज्यात सुरू असलेल्या वादाने अभिनेत्री सोनम कपूर आहुजाचे लक्ष वेधून घेतले आहे. चालू असलेल्या हिजाबच्या वादात सोनमने उडी घेतली आणि प्रश्न केला की जर पगडी हा पर्याय असू शकतो तर हिजाब का असू शकत नाही.

इन्स्टाग्रामवर सोनमने पगडी घातलेला एक पुरुष आणि हिजाब घातलेल्या महिलेचा एक फोटो शेअर केला आणि प्रश्न विचारला की पगडी ही निवड असू शकते परंतु हिजाब का नाही? हिजाब परिधान केल्याबद्दल कर्नाटकातील अनेक महिलांना आंदोलकांनी मारहाण केल्यानंतर सोनमची ही पोस्ट आली आहे.

हिजाबच्या वादात सोनम कपूर

सोनमने हिजाब वादावर तिचे मत शेअर केल्यानंतर लगेचच, सोशल मीडियाच्या एका भागाने ट्विटरवर सोनमवर ट्रोल हल्ला सुरू केला. परिणामी आज सकाळपासून मायक्रोब्लॉगिंग साइटवरील टॉप ट्रेंडमध्ये #SonamKapoor आहे. हिजाब वादावरील तिच्या मुद्द्यावर तिला प्रतिक्रियेचा सामना करावा लागत असताना सोनमलाही काही लोकांमध्ये पाठिंबा मिळाला आहे. देशासाठी असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर शांत न राहिल्याबद्दल तिचे कौतुक करत आहेत.

हेही वाचा -Hijab and Burqa in Bollywood :दीपिका पदुकोण ते आलिया भट्टपर्यंत चित्रपटात 'बुरखा' परिधान करणाऱ्या अभिनेत्री!!

कर्नाटक सरकारने 5 फेब्रुवारी रोजी "समानता, अखंडता आणि सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या" कपड्यांवर बंदी घालून सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ड्रेस कोड अनिवार्य करणारा आदेश जारी केल्यानंतर संपूर्ण वादाला तोंड फुटले. सोनमसह, गीतकार जावेद अख्तर, शबान आझमी, स्वरा भास्कर, रिचा चढ्ढा आणि चित्रपट निर्माते नीरज घायवान यांनीही या वादाविरोधात आवाज उठवला आहे.

दरम्यान शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाविरुद्ध (अद्याप लेखी आदेश जारी करण्यात आलेला नाही) राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब आणि इतर धार्मिक पोशाखांवर बंदी घालण्याच्या अपीलांवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.

हेही वाचा -Javed Akhtar on Hijab : ''हिजाब किंवा बुरख्याचे समर्थन नाही, परंतु गुंडांच्या जमावाबद्दल मनात तिरस्कार'' - जावेद अख्तर

ABOUT THE AUTHOR

...view details